प्रतिनिधी बालाजी निरफळ : धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील शेलगाव येथे एका पवनचक्की कंपनीच्या साईटवर 10-15 गावगुंडानी धुडघूस घालत आहे.
तिथली वाहने, कार्यालयाची तोडफोड करीत कामगार व स्थानिक नागरिकांना बेदम मारहाण केली.
मागील काही दिवसापूर्वीही असाच प्रकार घडला होता त्यानंतर पुन्हा हा प्रकार घडल्याने या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मारहाण प्रकरणी अखेर वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात कलम 324,427,143,147 सह अन्य कलमाद्वारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
निमगाव गोंधळ हाणामारी का कोणी केली हे अद्याप पोस्ट नसून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीचा तपास वाशी पोलीस करत आहेत