NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राईम / लग्नाच्या 3 वर्षांनंतर पहिल्या प्रियकरासोबत पुन्हा जुळलं सूत; तरुणीच्या हत्येनं झाला Love Story चा End

लग्नाच्या 3 वर्षांनंतर पहिल्या प्रियकरासोबत पुन्हा जुळलं सूत; तरुणीच्या हत्येनं झाला Love Story चा End

बराच वेळ प्रियांका आणि जगन्नाथ एकमेकांसोबत व्हॉट्सअॅपवर चॅट करीत होते. याबद्दल प्रियांकाच्या पतीला काहीच माहिती नव्हती.

15

भुवनेश्वर: ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमधील भीमाटंगी येथे एका विवाहित महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या प्रियकरानेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त समोर आलं आहे. घरमालकांना कळताच त्यांनी दोघांना रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी विवाहित महिलेला मृत घोषित केले. सध्या तिच्या प्रियकरावर पुढील उपचार सुरू आहेत. मात्र, या दोघांमध्ये असं काय घडलं, ज्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

25

घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार भीमटंगी येथील जाजपूर स्थित जगन्नाथ प्रधान यांची काही वर्षांपूर्वी प्रियंका प्रियदर्शनी साहू या तरुणीशी ओळख झाली होती. त्यांच्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर मात्र 2014 मध्ये प्रियंकाने राकेश साहू या तरुणाशी लग्न केलं. राकेश आणि प्रियांकाला तीन वर्षांचा मुलगा आहे. राकेश युरेका फोर्ब्ससाठी काम करतो.

35

लग्नानंतर प्रियांका घरी एकटीच होती. यानंतर ती पुन्हा जगन्नाथ प्रधान यांच्या संपर्कात आली आणि जुनं प्रेम पुन्हा नव्याने वाढू लागलं. गेल्या तीन आठवड्यांपासून प्रियंका जगन्नाथशी दिवसरात्र व्हॉट्सअॅप व फेसबुकवर बोलत होती. तिच्या पतीला याबाबत काहीच माहिती नव्हती. जगन्नाथ प्रधान आणि प्रियांका वेळोवेळी व्हॉट्सअ‍ॅपवर बोलत असत. परंतु, एकमेकांच्या संपर्कात असलेल्या या दोघांमध्ये नेमकं काय झालं, ते अद्याप कळू शकलेलं नाही. परंतु जगन्नाथ प्रधान यांने प्रियंका आणि तिच्या मुलांची हत्या करण्याचा कट रचला.

45

मिळालेल्या वृत्तानुसार त्यादिवशी प्रियांका घरीच होती. तिचा पती आणि मुलं त्यावेळी घरात नव्हते. यावेळी जगन्नाथ घरी आला व त्याने प्रियांकाचा गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तेथेच जगन्नाथने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरमालक आल्यावर जगन्नाथ आणि प्रियांका स्वतंत्र खोल्यांमध्ये जमिनीवर कोसळले होते. त्यानंतर दोघांना रुग्णालयात नेण्यात आले.

55

रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी प्रियांकाला मृत घोषित केले. जगन्नाथवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. पोलिसांना जगन्नाथ याने लिहिलेले एक पत्र सापडले आहे. ज्यामध्ये त्याने प्रियंका आणि तिच्या मुलाची हत्या करेल असं लिहिलं आहे. पोलिसांनी जगन्नाथविरूद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

  • FIRST PUBLISHED :