NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / क्राइम / आधी नोकराशी सलगी, मग साधला डाव; 74 लाखांच्या दरोड्याची अशी झाली उकल

आधी नोकराशी सलगी, मग साधला डाव; 74 लाखांच्या दरोड्याची अशी झाली उकल

Mumbai Robbery : गुंगीच औषध चारून चोरी करणाऱ्या एका चोरास गोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश लोहार असं आरोपींच नाव असून त्याने चोरी केलेली 74 लाख रुपयांची मालमत्ता पोलिसांनी परत मिळवली आहे.

17

मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील करधर ज्वेलर्समध्ये 15 मे रोजी दुकानातील कर्मचाऱ्याला बेशुद्ध करून 74 लाखांचा ऐवज लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांनी अखेर यश आलं आहे. (विजय वंजारा, प्रतिनिधी)

27

चोरी प्रकरणातील एक आरोपी सुरेश लेहरुलाल लोहार (28) याला राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून 74 लाख 25 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. वडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतही आरोपींनी असाच दरोडा टाकला होता.

37

संजय जैन यांचं गोरेगाव येथे करधर नावाचं ज्वेलर्सच दुकान आहे. दुकानात त्यांचा नोकर श्रावण खरवड हा राहतो. श्रावण याची सुरेश याने ओळख काढली. यानंतर 15 मे रोजी रात्री साडेअकरा वाजता संजय यांच्या दुकानात आला. त्याने श्रावण याला उठवलं. त्याला खायला आणल्याचं सांगितलं. श्रावण याला खायला दिले. त्यामुळे श्रावण बेशुद्ध पडला.

47

यानंतर सुरेश यांनी रात्रभर ते दुकान लुटलं. दुकानातील सोनं, चांदीचे दागिने लंपास केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संजय यांनी पोलिसात तक्रार केली.

57

पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत कोणतेच धागेदोरे नसल्याने सुरेश याचा सुगावा पोलिसांना लागत नव्हता.

67

पोलिसांनी दरोड्यानंतर जवळच बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने तपास सुरू केला. दरोड्यानंतर आरोपींनी दुकानात लावलेले सीसीटीव्हीचे डीव्हीआर मशीनही नेले होते.

77

या तपासासाठी 10 ते 12 टीम बनवण्यात आल्या होत्या. बऱ्याच तपासानंतर पोलिसांना यश आलं. पोलिसांनी सुरेश याला राज्यस्थान येथील राजसमन जिल्ह्यातून अटक केली.

  • FIRST PUBLISHED :