फळं-भाज्या खरेदी करताना काय काळजी घ्यावी, याबाबत फिजिशिअन डॉ. सुरेंद्र दत्ता यांनी मार्गदर्शन केलं आहे.
भाजी-फळं खरेदीला बाहेर पडताना सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेची काळजी जरूर घ्या.
आठवडाभराची भाजी एकाच वेळी घ्या, जेणेकरून जास्त घराबाहेर पडावं लागणार नाही
आपल्या परिसरातील एकाच भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी करा.
मास्क आणि ग्लोव्हज घातलेल्या भाजी विक्रेत्याकडून भाजी खरेदी करा.
घराजवळच भाजी खरेदीला जाणार असाल तर शक्यतो बादली घेऊन जा आणि भाजी विक्रेत्याला त्यामध्ये भाजी टाकण्यास सांगा, तुम्ही त्या भाज्यांना हात लावू नका. घरी आल्यानंतर भाजी असलेल्या त्या बादलीत थोडा वेळ पाणी ओतून ठेवा.
फ्लॉवर, पालक, ब्रोकोली अशा भाज्या कोमट पाण्यात धुवा.
भाज्या धुण्यासाठी डिटर्जंट वापरू नका, आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.