NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / कोरोना / धक्कादायक! नर्सने PPE सूट फाडून रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये कोरोना रुग्णासोबत केला सेक्स

धक्कादायक! नर्सने PPE सूट फाडून रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये कोरोना रुग्णासोबत केला सेक्स

या प्रकरणात दोघांनाही अटक करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने नर्स व आपल्यामध्ये काय घडलं याबाबतील सविस्तर माहिती व व्हिडीओही सोशल मीडियावर पोस्ट केला.

15

गेल्या वर्षभरापासून जगभरातील नागरिक कोरोनाशी लढा देत आहेत. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका नर्सने कोरोनााधित रुग्णासोबत शरीरसंबंध ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर नर्सचे तातडीने निलंबन करण्यात आले. या नर्सने रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये रुग्णासोबत शरीरसंबंध ठेवल्याची बाब समोर आली आहे. ही घटना इंडोनेशियातील आहे.

25

इंडोनेशियाची राजधानी जकार्तामधील कोरोना केंद्रातील एका रुग्णाने येथील नर्ससोबत शरीरसंबंध ठेवल्याचा धक्कादायक खुलासा सोशल मीडियावरुन केला. या व्यक्तीने नर्स व आपल्यामध्ये काय घडलं याबाबतील सविस्तर माहिती व व्हिडीओही पोस्ट केला. इतकच नाही तर या तरुणाने दोघांमध्ये झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉर्ट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

35

ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर दोघांचीही चौकशी करण्यात आली. दोघांनीही घडलेल्या प्रकाराची कबुली दिली आहे. जकार्तामधील विस्मा अॅटलेट कोरोना केंद्रातील टॉयलेटमध्ये शरीरसंबंध ठेवल्याचं दोघांनी मान्य केल्याचं द सनने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. शरीरसंबंध ठेवण्यासाठी या व्यक्तीने स्वत:च्या अंगावरील पीपीई सूट फाडल्याची कबुली दिली आहे.

45

यानंतर नर्स व त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. नर्सच्या संपर्कात आलेल्या अनेकांना सध्या आयसोलेट करण्यात आलं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर दोघांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला असून नर्सची चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र कोरोना हा संसर्गजन्य आजार ड्रॉपलेट्सबरोबरच कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीशी शरीरसंबंध ठेवल्याने पसरतो. त्यामुळे नर्सलाही आयसोलेट करण्यात आलं आहे.

55

या देशातील पॉर्नोग्राफीविरोधी कायद्यानुसार तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नर्सलाही निलंबित करण्यात आलं आहे. सध्या या दोघांची चौकशी सुरू आहे. धक्कादायक म्हणजे या प्रकरणातील नर्स हा रुग्णसेवा करणारा पुरुष आहे. इंडोनेशियामध्ये समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा असल्याने या प्रकारामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

  • FIRST PUBLISHED :