कोरोनाव्हायरसपासून बचावासाठी तुम्ही वारंवार हात धुत आहात. मात्र इतर वस्तूंवरही व्हायरस असू शकतो आणि या वस्तू स्वच्छ नसतील तर हातावर पुन्हा व्हायरस येऊ शकतात.
मोबाइल फोन - टॉयलेट सीटपेक्षाही जास्त जर्म्स मोबाइल सीटवर असतात, एका संंशोधनात दिसून आलं आहे. मोबाइल ही अशी वस्तू आहे, जिचा वापर तुम्ही दिवसभर करता. त्यामुळे मोबाइलही स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे.
दरवाजा, हँडल आणि इलेक्ट्रिक स्विच - घरात प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी आपला हात जातो तो दरवाज्याचा हँडल आणि स्विच बोर्डवर. त्यामुळे त्यावर जास्त किटाणू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिन्यातून दोनदा तरी याला डिसइन्फेक्ट करा.
चावी - घराच्या दरवाज्याची असो किंवा गाडीची चावी त्यावरही कोरोनाव्हायरस असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चावीच्या मदतीने तुम्ही चावी सॅनिटाइझ करू शकता.
कपडे - जेव्हा तुम्ही बाहेरून घरी येता तेव्हा फक्त हातच स्वच्छ धुता, मात्र कपड्यांवरही कोरोनाव्हायरस असू शकतो. त्यामुळे कपडेही धुवायला टाका.
पैसे - कोणतीही वस्तू खरेदी करताना किंवा विकताना पैशांची देवाणघेवाण होते. हे पैसे किती जणांच्या हातातून आले असावेत आपल्याला माहिती नाही. आता नोटा स्वच्छ करणं तर शक्य नाही, त्यामुळे लॉकडाऊनमध्ये शक्यतो जास्तीत जास्त ऑनलाइन पेमेंटवर भर द्या.