21 जूनपासून केंद्र सरकारमार्फत 18+ सर्वांना मोफत कोरोना लस दिली जाणार आहे. पण ज्यांना खासगी रुग्णालयात लस घ्यायची आहे, त्यांना ती घेता येईल.
देशातील लस उत्पादनाच्या 25 टक्के लस खासगी रुग्णालयांना खरेदी करता येईल. पण इथल्या लसीकरणावर राज्य सरकारचं लक्ष असेल.
खासगी रुग्णालयातील लशीसाठी पैसे आकारले जातील आणि याचे जास्तीत जास्त दर आता निश्चित करण्यात आले आहेत. या रुग्णालयांना जास्तीत जास्त 150 रुपयांपर्यंतच सर्व्हिस चार्ज आकारता येईल.
नव्या दरानुसार पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड लस प्रति डोस 780 रुपयांना असेल (लशीची मूळ किंमत 600 रुपये + 5% GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)
हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन प्रति डोस 1410 रुपये असेल (लशीची मूळ किंमत 1200 रुपये + 60 रुपये GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)
रशियाची स्पुतनिक-V प्रति डोस 1145 रुपये (लशीची मूळ किंमत 948 रुपये + 47 रुपये GST+सर्व्हिस चार्ज 150 रुपये)
या निश्चित दरापेक्षा अधिक दर आकाराल्यास खासगी कोरोना लसीकरण केंद्रावर कारवाई केली जाणार आहे.