NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / करिअर / Maharashtra SSC Result 2023: ना पैशांची चणचण, ना घ्यावी लागेल उधारी; 10वी नंतर हे पार्ट टाईम जॉब्स देतील पैसे

Maharashtra SSC Result 2023: ना पैशांची चणचण, ना घ्यावी लागेल उधारी; 10वी नंतर हे पार्ट टाईम जॉब्स देतील पैसे

MH Ssc Result 2023 Updates In Marathi: पार्ट टाइम नोकरी करावी तरी कोणती? कोणती नोकरी केल्यामुळे पैसे जास्त मिळू शकतील? असे प्रश्न विद्यार्थ्यंना पडत्तात. याच सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

16

महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result 2023) लवकरच जाहीर होणार आहे. मात्र निकालानंतर पास झालेत तरी काही विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडून किंवा शिक्षण सुरु असतानाच पार्ट टाइम जॉब करावे लागतात. होतकरू विद्यार्थी यातून मार्ग काढत शिक्षणासोबतच नोकरी करण्याचा पर्याय निवडतात. पण पार्ट टाइम नोकरी करावी तरी कोणती? कोणती नोकरी केल्यामुळे पैसे जास्त मिळू शकतील? असे प्रश्न विद्यार्थ्यंना पडत्तात. याच सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. बेस्ट पार्ट टाइम जॉब्स सांगणार आहोत. दहावीचा निकाल (ssc result 2023 maharashtra board date) पाहा एका क्लिकवर 

26

पार्ट टाइम जॉब करण्यासाठी तुम्ही लग्नामध्ये किंवा प्री वेडिंग शूट्ससाठी फोटोग्राफी करू शकता. जर तुम्हालाही फोटाग्राफीमध्ये आवड असेल तर तुम्हीही फोटोग्राफी करू शकता. विशेष म्हणजे शिक्षण आणि नोकरी सांभाळूनही तुम्ही हा पार्ट टाइम जॉब करू शकता

36

आजकाल बरेच हाय प्रोफाइल कॉफी शॉप्स आणि टी शॉप्स लोकप्रिय आहेत. अशा ठिकाणी काम करण्याचं विद्यार्थ्यांचं प्रमाणही वाढलं आहे. अशा ठिकाणी फक्त 5 ते 6 तासांच्या शिफ्टमध्ये काम करून 6000 ते 10000 रुपये मिळवता येतात. त्यामुळे हा पार्ट टाइम जॉबचा एक उत्तम पर्याय आहे.

46

आजकाल तरूणांमध्ये सर्वात कॉल सेंटरची जास्त क्रेझ आहे. कॉल सेंटरमध्ये (Call center jobs) डेटा एन्ट्रीचं कामही केलं जातं. यात वेगवेगळ्या वेळा असतात ज्यात रात्रीच्या वेळीही काही शिफ्ट होतात. हे काम घरी बसून देखील करू शकता. या कामासाठी 2 ते 6 तास द्यावे लागतील यासाठी 4000 ते 12000 रुपये मिळू शकतात.

56

खाजगी कार्यालय, रुग्णालय किंवा कंपनीमध्ये पार्ट टाइम रिसेप्शनिस्ट (Receptionist jobs) म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला 3000 ते 8000 रुपये मिळू शकतात. यासाठी आपल्याला 4 ते 5 तास द्यावे लागतील.

66

कोणत्याही पिझ्झा शॉपमध्ये तुम्ही पिझ्झा डिलिव्हरी पार्टनर (Pizza delivery Partner) म्हणून नोकरी शकता. 5 ते 6 तासांची शिफ्ट केल्यास तुम्ही 5000 ते 8000 रुपये मिळवू शकता.

  • FIRST PUBLISHED :