NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / करिअर / शेतात राबणारी ज्योती होणार डॉक्टर, पहिल्याच प्रयत्नात NEET मध्ये मिळवलं मोठं यश

शेतात राबणारी ज्योती होणार डॉक्टर, पहिल्याच प्रयत्नात NEET मध्ये मिळवलं मोठं यश

जिद्दीपुढे जग ठेंगणं! 6 तास वडिलांना शेतात मदत 6 तास अभ्यास करुन तरुणीनं नीटमध्ये मिळवले अव्वल मार्क्स

110

मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड : नांदेड जिल्हयातील कंधार तालक्यातील कंधारेवाडी या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याची मुलगी डॉक्टर होणार आहे. विशेष म्हणजे तीने शेतात काम करुन नीटची तयारी केली.

210

कुठलाही क्लास न लावता पहिल्याच प्रयत्नात ती नीटच्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. अंकुश कंधारे यांची अडीच एकर जमीन आहे. त्यावरच कंधारे कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालतो.

310

कंधारे यांच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यांची मुलगी ज्योती कंधारे अभ्यासात हुशार आहे. तिचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.

410

बारावी पर्यंतचे शिक्षण गावातीलच शाळेत झाले. ज्योती दहावीत असताना कोरोना मुळे लॉकडाऊन लागले होते. महामारीत लोकांचे जीव वाचवणारे डॉक्टर होते. ते पाहून आपल्याला देखील डॉक्टर होण्याची प्रेरणा मिळाली असे ज्योतीने सांगितले.

510

बारावी झाल्या नंतर तिने नीटची तयारी सुरू केली. गावात काही जणांनी नीटची परीक्षा दिली होती. त्यांच्या कडून मार्गदर्शन घेउन ज्योतीने अभ्यास सुरू केला.

610

you tube वरील व्हिडियो पाहून देखील ती अभ्यास करायची. सकाळीं शेतात जाऊन सहा तास काम , शेतात काही तास अभ्यास आणि घरी आल्यावर पाच ते सहा तास अभ्यास करायची.

710

तिला नीटच्या परीक्षेत 720 पैकी 563 गुण मिळाले . तीच स्वतःच आणि आई वडिलांचं डॉक्टर होण्याचं स्वप्रन पूर्ण होणार आहे . मात्र त्यातही एक अडथळा आहे.

810

सरकारी कोट्यातून नंबर लागला तरच ती डॉक्टर होउ शकते कारण खासगी कॉलेजमध्ये शिकायची ज्योती कंधारे हीची आथिर्क ऐपत नाही.

910

तिला भविष्यात स्त्री रोग तज्ञ व्ह्यायच आहे. तुम्ही या तरुणीला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाठबळ देऊ शकता. तुमची छोटी मदत तिचं भविष्य आणखी उज्ज्वल करेल.

1010

तुमचा मदतीचा हात मोलाचा आहे. मदतीसाठी इथे संपर्क करु शकता.

  • FIRST PUBLISHED :