गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे दहावी आणि बारावी स्टेट बोर्डाचे निकाल. अखेर आज म्हणजेच 02 जूनला 2023 ला स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल (Maharashtra state board 10th Result 2023) जाहीर झाला आहे. या निकालाबद्दलच्या टॉप गोष्टी जाणून घेऊयात.
कोकण विभागाचा सर्वाधिक 98.11 टक्के निकाल तर सर्वात कमी नागपूर विभागाचा 92.67 टक्के निकाल लागला.
लातूर पॅटर्न पुन्हा एकदा ठरला अव्वल, 108 विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के आहे.
राज्यात 100 टक्के मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 151 आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली आहे.
राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 98 टक्के आहे.
राज्यातील तब्बल 43 शाळा, त्यांचा निकाल हा शुन्य लागला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल राज्यात सर्वाधिक 98.54 टक्के आहे.
यंदा परीक्षेला 23 विद्यार्थी तृतीय पंथी प्रवर्गातून बसले होते. दहावीच्या निकालाचा टक्का 3.11 ने घसरला आहे.