NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / करिअर / Success Story : सरकारी शाळा ते IIT पर्यंतचा प्रवास, RBI मध्ये नोकरी, 3 वेळा अपयश आणि नंतर एका निर्णयाने IRS

Success Story : सरकारी शाळा ते IIT पर्यंतचा प्रवास, RBI मध्ये नोकरी, 3 वेळा अपयश आणि नंतर एका निर्णयाने IRS

दरवर्षी लाखो लोक नागरी सेवेत येण्याचे स्वप्न पाहतात. त्यांच्यापैकी काहीजण त्यांच्या मेहनतीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांचे स्वप्न पूर्ण करतात. त्या निवडलेल्या लोकांमध्ये राजस्थानमधील रहिवासी असलेल्या आयआरएस शेखर यांचाही समावेश आहे. आयआयटीमधून शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बँकेत नोकरी केली आणि त्यासोबतच यूपीएससी परीक्षेची तयारीही केली. आज जाणून घेऊयात त्यांचा यशस्वी प्रवास.

17

राजस्थानचे रहिवासी असलेल्या चंद्रशेखर मीणा यांच्यासाठी आयआरएस अधिकारी बनणे सोपे नव्हते. यासाठी त्यांनी केवळ मेहनतच केली नाही, तर अनेक वर्षे वाटही पाहिली. पूर्णवेळ नोकरीसह UPSC परीक्षेची तयारी करणे सोपे नसते. पण चंद्रशेखर यांनी ते करुन दाखवले. त्यांनी दुप्पट मेहनत करून आपले स्वप्न पूर्ण केले आणि नागरी सेवेत रुजू होऊन ते आयआरएस अधिकारी बनले.

27

चंद्रशेखर मीणा यांना प्रवासाची आवड आहे. त्यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1991 रोजी राजस्थानमधील दौसा येथे झाला. पण त्यांचे पालनपोषण हे हनुमानगड (हनुमानगड, राजस्थान) मध्ये झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक लहान बहीण, पत्नी आणि एक मुलगी (सावित्री प्रखर) असा परिवार आहे. त्यांचे वडील स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर मध्ये लिपिक होते. तर आई गृहिणी आणि बहीण स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत.

37

चंद्रशेखर यांचे शालेय शिक्षण राजस्थानमधील हनुमानगड येथून झाले. त्यांना 10वी मध्ये 82.6% आणि 12वी मध्ये 84.2% गुण मिळाले होते. यानंतर त्यांनी IIT ISM Dhanbad मधून पदवी प्राप्त केली. त्यात त्यांचा सीजीपीए 7.80 होता. पदवीचे शिक्षण पूर्ण होताच शेखर यांनी स्वयं-अभ्यासाद्वारे UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. सध्या ते हल्दिया, कोलकाता येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

47

सरकारी नोकरीसोबतच UPSC परीक्षेची तयारी करणे खूप अवघड आहे. पण चंद्रशेखर यांनी ते शक्य करून दाखवले. पदवीनंतर त्यांनी गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशनमध्ये 1 वर्ष काम केले. त्यानंतर कोटाच्या एसबीआय, महावीर नगर शाखेत 1 वर्ष (पीओ म्हणून काम केले. त्यानंतर 4 वर्षे नवी मुंबईत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले.

57

पूर्णवेळ नोकरीमुळे शेखर यूपीएससी कोचिंगमध्ये सहभागी होऊ शकले नाही. त्यांची तयारी ते ऑनलाइन स्टडी मटेरियल, यूट्यूब व्हिडीओ आदींच्या माध्यमातून करत असत. त्यांनी चर्चेसाठी 20-25 जणांचा गट तयार केला होता. मुख्य परीक्षेपूर्वी सर्वजण सुट्टी घेऊन एका ठिकाणी जमायचे. ते मेन्ससाठी ऑनलाईन चाचणी मालिकेत सामील झाले होते आणि त्यांच्या नोट्स Evernote वर जतन करत असत.

67

IRS चंद्रशेखर मीणाने UPSC परीक्षेच्या चौथ्या प्रयत्नात 655 वा क्रमांक मिळवला. पहिल्या तीन प्रयत्नांत त्यांनी लोकप्रशासन हा ऐच्छिक विषय ठेवला होता. त्यानंतर 1 वर्षाचा ब्रेक घेऊन हिंदी साहित्य हा ऐच्छिक विषय म्हणून केला. त्यांच्या या एका निर्णयामुळेच ते आपले ध्येय गाठू शकले, असे त्यांना वाटते. मुलाखतीत त्यांना त्याच्या टायबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी दबावाखाली त्याने तो टाय चेन्नईहून विकत घेतल्याचे सांगितले होते. अर्थात, आता जर त्यांना ते उत्तर द्यायचे असते तर त्यांनी हसत हसत म्हटले असते की, हे त्यांच्या प्रेयसीने त्यांना गिफ्ट केलंय.

77

IRS चंद्रशेखर मीणा यांचे एप्रिल 2021 मध्ये लग्न झाले. त्यांची पत्नी बिहारची असून त्यांचे नाव प्रतिभा नारायण (IRS चंद्रशेखर मीना पत्नी) आहे. त्या सध्या आरबीआय मुंबईमध्ये एजीएम पदावर कार्यरत आहेत. UPSC इच्छुकांसाठी त्यांचा सल्ला असा आहे की, कठोर परिश्रमाला पर्याय नाही. तुमचे लक्ष स्मार्ट कामावर असले पाहिजे. अर्धी लढाई मनाच्या आत जिंकली जाते. त्यामुळे तुमच्या तयारीवर विश्वास ठेवा. मोठी स्वप्ने पहा आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करा, असा सल्ला ते देतात.

  • FIRST PUBLISHED :