NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / करिअर / यालाच म्हणतात Success! स्टार्टअप्सच्या दुनियेत भारताचा डंका; ब्रिटन आणि चीनलाही धक्का; आकडेवारी बघून वाटेल अभिमान

यालाच म्हणतात Success! स्टार्टअप्सच्या दुनियेत भारताचा डंका; ब्रिटन आणि चीनलाही धक्का; आकडेवारी बघून वाटेल अभिमान

भारतातील 100 स्टार्टअप्स आता युनिकॉर्न बनले आहेत. ब्रिटन या बाबतीत भारताच्या मागे आहे. यूकेमध्ये फक्त 9 कंपन्या स्टार्टअप बनल्या आहेत.

18

जगात आणि भारतात स्टार्टअप्स ही संकल्पना आता घर करू लागली आहे. जॉब करण्याऐवजी आता तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा मिळू लागली आहे. त्यात शार्क टॅंकसारख्या शोजमुळे तरुणांमध्ये स्टार्टअप्स सुरु करण्याची इच्छा जागृत होत आहे. भारतही या सर्व गोष्टीत आता मागे नाहीये. ब्रिटेन आणि चीनसारख्या देशांनाही मागे सोडत आता भारतानं स्टार्टअप क्षेत्रात प्रगती केली आहे.

28

गेल्या दशकात म्हणजेच 2012-2022 मध्ये भारतात स्टार्टअप्सची काय स्थिती होती हे आज आम्ही सांगणार आहोत. रिपोर्ट्सनुसार, भारतात 2012-2022 मध्ये तब्ब्ल 58,000 स्टार्टअप्स सुरु करण्यात आलेत.

38

यामध्ये 2015 साली सर्वात जास्त म्हणजे 8000 तर 2022 साली 622 स्टार्टअप्स सुरु करण्यात आलेत. विशेष म्हणजे कोरोना काळातही स्टार्टअप्स सुरु होण्याची संख्या जास्त होती.

48

एकूण स्टार्टअप्सपैकी फिनटेक आणि ईकॉमर्स क्षेत्रातील स्टार्टअप्सना अधिक फंडिंग मिळाली. विशेष म्हणजे कोरोनाकाळात 2021 मध्ये स्टार्टअप्सना 42 बिलियन डॉलर्स इतकी फंडिंग मिळाली.

58

भारतीय स्टार्टअप इकोसिस्टम ही युनिकॉर्नच्या संख्येच्या बाबतीत जगातील तिसरी सर्वात मोठी आहे. 5 मे 2022 पर्यंत 100 पेक्षा जास्त युनिकॉर्न आहेत, ज्यांचे एकूण मूल्य $332.7 अब्ज आहे.

68

2021 या वर्षात युनिकॉर्नच्या संख्येत मोठी उडी नोंदवली गेली. या कालावधीत एकूण 44 स्टार्टअप युनिकॉर्न युनिकॉर्न क्लबमध्ये सामील झाले ज्याचे एकूण मूल्य $93 अब्ज आहे. 2022 च्या पहिल्या चार महिन्यांत भारतात 14 युनिकॉर्न तयार करण्यात आले आहेत ज्यांचे एकूण मूल्य $18.9 अब्ज आहे.

78

भारतातील 100 स्टार्टअप्स आता युनिकॉर्न बनले आहेत. ब्रिटन या बाबतीत भारताच्या मागे आहे. यूकेमध्ये फक्त 9 कंपन्या स्टार्टअप बनल्या आहेत.

88

बेंगळुरूमध्ये युनिकॉर्नची सर्वाधिक संख्या आहे. तर महाराष्ट्र हे सर्वाधिक स्टार्टअप्स असणारं राज्य आहे.

  • FIRST PUBLISHED :