NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / करिअर / असा शिक्षक होणे नाही! कोरोना महासाथीत विद्यार्थ्यांच्या दारासमोरचं आणली शाळा

असा शिक्षक होणे नाही! कोरोना महासाथीत विद्यार्थ्यांच्या दारासमोरचं आणली शाळा

या सरांच्या कामासाठी शब्द अपूरे आहेत... कोरोना काळात शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण दिले जात असले तरी अनेक कुटुंबाकडे स्मार्टफोन उपलब्ध नाही, अशावेळी मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी हे शिक्षक बाइकवर ब्लॅकबोर्ड लावून मुलांच्या घरासमोर जाऊन त्यांना शिकवित आहेत

14

छत्‍तीसगढ राज्यातील कोरिया जिल्ह्यात (Chhattisgarh's Korea district) एक सरकारी शाळेचे शिक्षक (government school teacher) मुलांना शिकवण्यासाठी जे प्रयत्न करीत आहेत, ते अत्यंत कौतुकास्पद आहे. सरकारी शाळेत शिकवणारे शिक्षक रुद्र राणा (Rudra Rana) यांनी अपल्या बाइकवर ब्लॅकबोर्ड म्हणजेच फळा बांधून ठेवला आहे आणि ते कोरोना महासाथीमुळे जागोजागो जाऊन मोहल्ला क्लासेसच्या माध्यमातून मुलांना शिकवत आहेत.

24

यावेळी रुद्र म्हणाले, कोरोना महासाथीमुळे शाळा बंद आहेत, शिवाय स्मार्टफोन नसल्याने अनेक विद्यार्थी ऑनलाइन क्लास अटेंड करू शकत नाही. अशात मुलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना शिकवण्याचा विचार माझ्या डोक्यात आला.

34

ते पुढे म्हणाले की, येथील अत्यंत कमी मुलांना ऑनलाइन क्लासेसला हजेरी लावता येते. अशात आम्ही मोहल्ला क्लास सुरू केला. अशातही आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतो. त्यांच्या घरासमोर येऊन मी त्यांना शिकवतो. माझ्यासोबतच ब्लॅकबोर्ड, पुस्तकं आणि प्लेकार्डसदेखील असतात. मी घंटा वाजवतो आणि मुलं सामान्य शाळेप्रमाणे हजर होतात. विद्यार्थी सुरुवातीची प्रार्थना करतात, त्यानंतर अभ्यासक्रमानुसार क्लास सुरू केला जातो.

44

ते पुढे म्हणाले की, या क्लासेसमध्ये विविध विषयांबरोबरच त्यांना कोरोना व्हायरसबद्दलही माहिती दिली जाते. विशेष म्हणजे स्थानिकांकडून याला पाठिंबा मिळत आहे. या शिक्षकाच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडणार नाही.

  • FIRST PUBLISHED :