NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / करिअर / PHOTOS: UPSC च्या टॉप-5 मध्ये येणारा एकमेव मुलगा कोण आहे? IAS व्हायचं नव्हत, पण..

PHOTOS: UPSC च्या टॉप-5 मध्ये येणारा एकमेव मुलगा कोण आहे? IAS व्हायचं नव्हत, पण..

UPSC Result 2022: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने आज म्हणजेच 23 मे रोजी निकाल जाहीर केला. सलग चौथ्या वर्षी टॉपर्सच्या यादीत महिलांनी अव्वल स्थान पटकावले आहे. पहिल्या पाचमध्ये चार महिला आहेत.

15

आसाममधील तेजपूरचा रहिवासी असलेले मयूर हजारिका सुरुवातीपासूनच टॉपर आहेत. ते त्यांच्या हायस्कूल आणि उच्च माध्यमिकमध्ये टॉपर होते. त्यांनी त्यांचे इंटरमिजिएट म्हणजेच उच्च माध्यमिक शिक्षण रामानुजन कनिष्ठ महाविद्यालय, नागाव जिल्ह्यातून केले आहे. (सामाजिक माध्यमे)

25

हजारिका हे व्यवसायाने डॉक्टर आहेत, त्यांनी गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधून एमबीबीएस पूर्ण केलंय. हजारिका यांनी निकालानंतर सांगितले की, आपण यूपीएससीची स्मार्ट पद्धतीने तयारी केली होती, पण इतकी चांगली रँक मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. (ट्विटर)

35

मयूर हजारिका यांचे अभिनंदन करताना आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, 'तुम्ही 5 वी अखिल भारतीय रँक मिळवून आम्हा सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. तुमचे यश अतुलनीय आहे आणि राज्यातील तरुणांना तुमचं यश प्रेरणा देईल. वेल डन, आणि माझे आशीर्वाद' (ट्विटर)

45

माध्यमांशी बोलताना हजारिक यांनी सांगितले की, मला चांगल्या रँकची अपेक्षा नव्हती. पण, मी रिझल्टने खूप आनंदी आहे. UPSC ची तयारी त्यांनी खूप छान केली होती. प्रिलिमच्या तयारीसाठी त्यांनी निवडक नोट्स तयार केल्या आणि विषयनिहाय अभ्यास केला. त्यांनी सांगितले की माझे पहिले प्राधान्य भारतीय विदेश सेवा (IFS) होते, जे मला मिळेल. (ट्विटर)

55

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 च्या निकालात एकूण 933 विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. टॉप 5 मध्ये 4 महिला आहेत. पाचव्या क्रमांकावर आसामचा तेजपूरचा मयूर हजारिका आहेत. (ट्विटर)

  • FIRST PUBLISHED :