NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / फोटो गॅलरी / लालभडक नव्हे तर निळाशार; असा ज्वालामुखी तुम्ही कधी पाहिलात का?

लालभडक नव्हे तर निळाशार; असा ज्वालामुखी तुम्ही कधी पाहिलात का?

सोशल मीडियावर सध्या निळ्या लाव्हाच्या या ज्वालामुखीचे फोटो व्हायरल होत आहेत.

17

ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा त्यातून लालभडक आगीसारखा तपता लाव्हा बाहेर पडतो. मात्र सध्या सोशल मीडियावर निळ्या रंगाच्या लाव्हाचा फोटो व्हायरल होतो आहे आणि चर्चा सुरू झाली आहे. (@Thunderflask/Twitter)

27

इंडोनेशियातील कावा इजेन ज्वालामुखी आहे, ज्याच्या या निळ्या रंगाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

37

हा रंग फक्त निळाच नाही तर चमकदार निळा असा आहे. इलेक्ट्रिक ब्लू रंगाचा लाव्हा बाहेर पडतो आहे असंच वाटतं. मात्र हा निळा रंग लाव्हाचा नाही. (@Thunderflask/Twitter)

47

या ज्वालामुखीवर कित्येक वर्षांपासून डॉक्युमेंट करणारे पॅरिसचे फोटोग्राफर ओलिवर ग्रुनेवाल्ड यांनी सांगितलं हा निळा चमकदार रंग लाव्हाचा नाही. तर ज्वालामुखीतून सल्फ्युरिक अॅसिड बाहेर येतो आणि त्याचा ऑक्सिजनशी संपर्क आल्यानंतर त्यातून निळ्या ज्वाला निर्माण होतात. (Olivier Grunewald/Instagram)

57

तरल असं सल्फर जळत राहतं आणि ते ज्वालामुखीच्या डोंगरावरून खाली येऊ लागतं तेव्हा तो एखाद्या लाव्हारसाप्रमाणेच वाहत आहे, असं वाटतं. (Olivier Grunewald/Instagram)

67

निळा रंग रात्री सूर्यास्तानंतर खूपच चांगला दिसून येतो, असंही ओलिवर यांनी सांगितलं. (Olivier Grunewald/Instagram)

77

दरम्यान या ज्वालामुखीचं असं दृश्यं पहिल्यांदाच दिसलं नाही तर याआधीदेखील हे फोटो व्हायरल झालेत. मात्र सध्या लॉकडाऊनमध्ये लोकांचं लक्ष याकडे पुन्हा गेलं आणि पुन्हा हे फोटो इंटरनेटवर व्हायरल झालेत.

  • FIRST PUBLISHED :