NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / World's Fastest Electric Car: मुंबई ते कोल्हापूर अवघ्या एका तासात, ‘या’ इलेक्ट्रिक कारचा नादच खुळा

World's Fastest Electric Car: मुंबई ते कोल्हापूर अवघ्या एका तासात, ‘या’ इलेक्ट्रिक कारचा नादच खुळा

जगात अशी इलेक्ट्रिक कार बनवण्यात आली आहे जिचा कमाल वेग ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. या इलेक्ट्रिक कारचा वेग 412 किमी ताशी आहे. या कारचे नाव 'रिमेक नेवेरा' (Rimac Nevera) आहे. ही कार जगातील सर्वात वेगाने धावणारी इलेक्ट्रिक कार ठरली आहे. या कारला 0 ते 100 किमीचा वेग केवळ 1.97 सेकंदात गाठला. या कारला इलेक्ट्रिक हायपरकार (EV Hypercar) म्हटलं जात आहे. या कारनं अलीकडेच 412 किमीचा वेग गाठून तिनं विक्रम केला होता.

16

जगात अशी इलेक्ट्रिक कार बनवण्यात आली आहे जिचा कमाल वेग ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. या इलेक्ट्रिक कारचा वेग 412 किमी ताशी आहे. या कारचे नाव 'रिमेक नेवेरा' (Rimac Nevera) आहे. ही कार जगातील सर्वात वेगाने धावणारी इलेक्ट्रिक कार ठरली आहे. या कारला 0 ते 100 किमीचा वेग केवळ 1.97 सेकंदात गाठला. या कारला इलेक्ट्रिक हायपरकार (EV Hypercar) म्हटलं जात आहे. या कारनं अलीकडेच 412 किमीचा वेग गाठून तिनं विक्रम केला होता.

26

सिंगल चार्जमध्ये 482 किमीची रेंज: रिमेक नेवेरा एका चार्जमध्ये सुमारे 482 किमी अंतर कापेल असा कंपनीनं दावा केला आहे. या कारमध्ये बॅटरीची कार्यक्षमता दाखवण्यासाठी आत आणि बाहेर विशेष लाईट्स लावण्यात आले आहेत. ही कार 350 kW क्षमतेच्या चार्जरने 25 मिनिटांत 80 टक्के चार्ज होईल.

36

रिमेक नेवेरा कारमध्ये 1,914 हॉर्स पॉवरची मोटर आहे. ही मोटर कंपनीच्या अभियंत्यांनी बनवली आहे. या मोटरमुळे कार केवळ 1.85 सेकंदात 0 ते 60 किमीचा वेग पकडू शकते. कार 4.3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते.

46

नुकतेच जर्मनीमध्ये रिमेक न्यूराचे स्पीड टेस्टिंग करण्यात आले. जर्मनीतच 400 किमी वेगाने धावणाऱ्या कारची चाचणी घेण्याची सुविधा आहे. कमीत कमी वेळेत हा वेग गाठणारी ही जगातील सर्वात वेगवान कार देखील आहे. तिची चाचणी नियंत्रित स्थितीत करण्यात आली. या वेगाची कार अद्याप ग्राहकांना उपलब्ध झालेली नाही.

56

डिझाईनबद्दल बोलायचं झाल्यास, ही कार खूपच स्टायलिश दिसते. संपूर्ण कारच्या बॉडीवर स्कूल लाइन्स आहेत. यात 20 इंची अलॉय व्हील्स आहेत. ही कार बनवताना वापरल्या जाणार्‍या मटेरिअलचा विचार केला तर त्यामध्ये कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. हे मटेरियल स्टीलपेक्षा पाच पट हलकं आणि मजबूत आहे. यामुळे नेवरा रिमेक अतिशय हलकी कार बनते.

66

जर तुम्ही या कारच्या वेगामुळे प्रभावित होऊन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची निराशा होऊ शकते. कंपनीने या स्पीडसह कार ग्राहकांना विकण्यास नकार दिला आहे. केवळ 352 किमीचा वेग असलेली कार ग्राहकांना विकली जाईल. सध्या, क्रोएशियातील झाग्रेब येथील रिमेकच्या मुख्यालयात ग्राहकांसाठी कारचे उत्पादन केले जात आहे.

  • FIRST PUBLISHED :