NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / सणासुदीच्या काळात स्कूटर घ्यायचीये? 'हे' आहेत 5 सर्वोत्तम पर्याय, किंमतही कमी

सणासुदीच्या काळात स्कूटर घ्यायचीये? 'हे' आहेत 5 सर्वोत्तम पर्याय, किंमतही कमी

अनेक लोक दिवाळीच्या मुहूर्तावर दुचाकी करत असतात. दिवाळीच्या महिन्यात डीलर्स सहसा मोठ्या प्रमाणात सूट, ऑफर किंवा इतर सवलती देतात. जर तुम्ही नवीन स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशाच 5 पेट्रोल स्कूटरबद्दल सांगत आहोत, जे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.

15

Honda Activa 6G ही भारतातील सर्वात लोकप्रिय स्कूटर आहे आणि दर महिन्याला मोठ्या प्रमाणात विकली जाते. ही स्कूटर 109.51cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे. स्कूटरची सध्या एक्स-शोरूम किंमत 72,400 ते 75,400 रुपये आहे.

25

या यादीतील दुसरी स्कूटर हीरो प्लेजर प्लस आहे. वजनानं हलकी असल्यानं महिलांसाठी ती उत्तम आहे. प्लेजर प्लस हे 110.9cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनद्वारे समर्थित आहे. Hero Pleasure Plus ची एक्स-शोरूम किंमत 66,768 ते 75,868 रुपये आहे.

35

TVS NTorq 125 ही स्पोर्टी स्कूटर तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. यात 124.8cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, थ्री-वॉल्व्ह, इंधन-इंजेक्‍ट इंजिन मिळतं. ही स्कूटर अधिक शक्तिशाली रेस XP लुकमध्ये देखील उपलब्ध आहे. TVS NTorq 125 ची एक्स-शोरूम किंमत 79,950 रुपये ते 99,960 रुपये आहे.

45

Suzuki Access 125 ही भारतीय बाजारपेठेतील सर्वोत्तम 125cc फॅमिली स्कूटरपैकी एक आहे. ही नो-नॉनसेन्स गियरलेस स्कूटर 124cc सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिनसह येते. Suzuki Access 125 ची सध्याची किंमत 77,600 रुपये ते 87,200 रुपये एक्स-शोरूम आहे.

55

या यादीतील शेवटची स्कूटर Yamaha Aerox 155 आहे. मास-मार्केट विभागातील ही सर्वात शक्तिशाली आणि सर्वात महाग स्कूटर आहे. स्कूटरला 155cc सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन मिळते. त्याची एक्स-शोरूम किंमत सध्या 1.39 लाख रुपये ते 1.41 लाख रुपये आहे.

  • FIRST PUBLISHED :