NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / Top 5 Best Selling SUVs: फक्त प्रेयसीवरच नाही ‘या’ 5 कारवरही भारतीय फिदा, तुमची फेव्हरेट SUV कोणती?

Top 5 Best Selling SUVs: फक्त प्रेयसीवरच नाही ‘या’ 5 कारवरही भारतीय फिदा, तुमची फेव्हरेट SUV कोणती?

Top 5 Best Selling SUVs: जर तुम्ही नवीन एसयूव्ही कार घेण्याचा विचार करत असाल, तर इथे तुम्हाला 7 लाख ते 15 लाख रुपयांपर्यंतच्या 5 बेस्ट सेलिंग एसयूव्हींबद्दल सांगत आहोत. या गाड्यांची सर्वाधिक खरेदी केली जात आहे. या वाहनांच्या हजारो युनिटची दर महिन्याला विक्री होत आहे.

110

Tata Motors नेक्सॉन SUV भारतात ICE आणि EV दोन्ही प्रकारात विकली जाते. जानेवारीत SUV ही भारतातील पाचवी सर्वाधिक विक्री होणारी कार होती आणि SUV विभाग पहिल्या क्रमांकावर होता. (फोटो क्रेडिट्स: टाटा मोटर्स)

210

टाटाने एसयूव्हीच्या 15,567 युनिट्सची विक्री केली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या 13,816 युनिट्सपेक्षा जास्त होती. (फोटो क्रेडिट्स: टाटा मोटर्स)

310

Hyundai ची फ्लॅगशिप कॉम्पॅक्ट SUV हे सेगमेंटमध्ये सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल आहे. Hyundai Creta च्या 15,037 युनिट्सची विक्री झाली आहे. या कारसाठी वेटिंग लिस्टही मोठी आहे. (फोटो क्रेडिट्स: ह्युंदाई)

410

गेल्या वर्षीच्या जानेवारीत या कारची 9,869 युनिट्स आणि मागील महिन्यात 10,205 युनिट्स विकली गेली होती. या वर्षाच्या अखेरीस Hyundai नवीन जनरेशन क्रेटा भारतात लॉन्च करू शकते. (फोटो क्रेडिट्स: ह्युंदाई)

510

मारुती सुझुकीची सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ब्रेझा गेल्या वर्षी नवीन अवतारात लॉन्च करण्यात आली होती. तेव्हापासून ब्रेझाच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे आणि ती तिच्या विभागातील क्रमांक दोनवर पोहोचण्यात यशस्वी झाली आहे. (फोटो- मारुती सुझुकी)

610

मारुतीने जानेवारीमध्ये या एसयूव्हीच्या 14,359 युनिट्सची विक्री केली. त्यापूर्वी डिसेंबरमध्ये 11,200 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जुन्या पिढीतील विटारा ब्रेझाची फक्त 9,576 युनिट्स विकू शकली.

710

Tata Motors मधील सर्वात लहान SUV, पंच ही भारतभरात सर्वाधिक विकल्या जाणार्‍या मॉडेल्सपैकी एक आहे. तसेच, ही देशातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. ती लॉन्च होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. (छायाचित्र सौजन्य टाटा मोटर्स)

810

टाटाने जानेवारीमध्ये एसयूव्हीच्या 12,006 युनिट्सची विक्री केली, जी 2021 मध्ये पदार्पण केल्यापासूनची सर्वोत्तम कामगिरी आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये टाटाने या एसयूव्हीच्या 10,027 युनिट्सची विक्री केली होती. (फोटो क्रेडिट्स: टाटा मोटर्स)

910

Hyundai Motor's Venue ही सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक आहे. नेक्सॉन किंवा अगदी नवीन ब्रेझाला ही विक्रीमध्ये हरवू शकली नसली तरीही ही कार चांगली कामगिरी करत आहे. गेल्या वर्षी नवीन पिढीचे मॉडेल रस्त्यावर आले. (फोटो क्रेडिट्स: ह्युंदाई)

1010

Hyundai ने गेल्या महिन्यात SUV च्या 10,783 युनिट्सची विक्री केली होती. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये 11,377 युनिट्सची विक्री झाली होती. (फोटो क्रेडिट्स: ह्युंदाई)

  • FIRST PUBLISHED :