NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / Flying Bike: जगातील पहिली उडणारी बाईक लाँच; वेग तब्बल 100 किमी/तास; काय आहे किंमत?

Flying Bike: जगातील पहिली उडणारी बाईक लाँच; वेग तब्बल 100 किमी/तास; काय आहे किंमत?

Flying Bike: ही बाईक AERWINS Technologies या जपानी स्टार्टअप कंपनीनं बनवली आहे. 15 सप्टेंबर रोजी डेट्रॉईट ऑटो शोमध्ये तिला लाँच करण्यात आलं होतं. जपानमध्ये या बाईकची विक्री सुरू झाली आहे. - (सर्व फोटो - xturismo_official इन्टाग्राम पेज)

17

जगातील पहिली उडणारी बाईक लाँच झाली आहे. हे ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. जर तुम्ही ट्रॅफिक जॅमने त्रस्त असाल आणि हवेत उडून एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी यापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही.

27

AERWINS Technologies या जपानी स्टार्टअप कंपनीनं ही बाईक बनवली आहे. 15 सप्टेंबर रोजी डेट्रॉईट ऑटो शोमध्ये तिला लाँच करण्यात आलं होतं. शो दरम्यान, तज्ञांनी या बाइकचं खूप कौतुक केलं.

37

Xturismo असं या बाईकचं नाव आहे. डेट्रॉईट ऑटो शोचे सह-अध्यक्ष थाड स्झोट यांनी या बाईकचं कौतुक केलं. त्यांनी स्वतः या बाईकची टेस्ट केली. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की, हे खूप उत्साहवर्धक आणि आश्चर्यकारक आहे.

47

अर्थात ही बाईक लोकांच्या स्वप्नांना सत्यात उतरवते. परंतु तुम्हाला यासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागेल. कंपनीच्या मते या बाईकची किंमत 7 लाख 77 हजार डॉलर्स आहे. म्हणजेच जर तुम्ही ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित केली तर तुम्हाला 6 कोटी 18 लाख रुपये खर्च करावे लागतील.

57

या बाईकचं वजन 300 किलो आहे. ही उडणारी बाईक ताशी 100 किलोमीटर वेगानं उड्डाण करू शकते. तिला बॅटरीच्या माध्यमातून पावर दिली जाते. कंपनीचं म्हणणं आहे की तिच्या लहान इलेक्ट्रिक मॉडेलची किंमत सुमारे 50,000 डॉलर्स म्हणजेच साधारणपणे 39,82,525 रुपये असेल.

67

ही बाईक जपानमध्ये काळ्या, निळ्या आणि लाल रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तिचे निर्माते 2023 मध्ये अमेरिकेत तिची विक्री सुरू करण्याची योजना आखत आहेत.

77

AERWINS ने आपल्या वेबसाइटवर म्हटलं आहे की, या बाईकच्या माध्यमातून सुरक्षिततेसह उड्डाणाचा थरार अनुभवता येतो. तुम्हाला ही बाईक आवडली असेल आणि ती खरेदी करायची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला तुम्हाला जपानला जावं लागेल.

  • FIRST PUBLISHED :