काही अहवालांमधून असं सूचित होत आहे की टाटा मोटर्स पंचला नवीन RDE-अनुरूप इंजिनसह सुसज्ज करत आहे. हे इंजिन सध्याच्या पॉवरट्रेनपेक्षा अधिक रिफाइंड असेल. परिणामी, कारच्या इंजिनचा आवाज लक्षणीयरित्या कमी होईल आणि कार्यक्षमता देखील सुधारेल.
महत्त्वाचं म्हणजे, RDE मानदंड हे BS6 फेज-II उत्सर्जन मानदंडांचा भाग आहेत, जे 1 एप्रिल 2023 पासून लागू होतील. RDE नुसार, भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या सर्व वाहनांना MIDC (मॉडिफाईड इंडियन टेस्ट सायकल) चाचण्यांना सामोरं जावं लागेल.
यासाठी वाहनांमध्ये नवीन डिव्हाइस बसवण्यात येणार आहे, ज्यामुळं वाहनांच्या उत्सर्जनावर रिअल टाइममध्ये लक्ष ठेवता येईल. नवीन टाटा पंचमध्ये पॉवर आणि टॉर्क आउटपुटमध्ये कोणतेही मोठे बदल होणार नाहीत.
सध्या, पंचचे 1.2-लीटर पेट्रोल इंजिन 85 Bhp कमाल पॉवर आणि 113 Nm पीक टॉर्क बनवते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. पंचमध्ये इको आणि सिटी हे दोन ड्राइव्ह मोड्स देखील मिळतात.
या मायक्रो-एसयूव्हीच्या पूर्ण लोड केलेल्या व्हेरियंटमध्ये 16-इंच डायमंड कट अलॉय, ऑटो फोल्डिंग ORVM, रिअर वायपर आणि डिफॉगर, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 6-स्पीकर हरमन म्युझिक सिस्टम आणि कनेक्टेड कार (ऑप्शनल फीचर) सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.
टाटा पंच ही देशातील सर्वात सुरक्षित कारपैकी एक आहे. कारण तिला 5-स्टार GNCAP सुरक्षा रेटिंग आहे. टाटा पंच टियागो एनआरजी क्रॉस-हॅचबॅक आणि नेक्सॉन कॉम्पॅक्ट एसयूव्ही यांच्यादरम्यानच्या किंमत श्रेणीमध्ये येणारी एक चांगली कार आहे.
कारमध्ये फक्त फ्रंट-व्हील ड्राइव्ह सिस्टम मिळते. पंच खराब भारतीय रस्त्यांवर जाण्यासाठी डिझाइन केली आहे. पंचच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये निसान मॅग्नाइट आणि रेनॉल्ट किगर यांचा समावेश आहे.
सुरक्षेसाठी, टाटा पंचला ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, मागील डिफॉगर, मागील पार्किंग सेन्सर्स, एक रियर-व्ह्यू कॅमेरा आणि ISOFIX अँकर यांसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये मिळतात.
टाटा मोटर्स सीएनजी एडिशन आणि इलेक्ट्रिक आवृत्ती देखील लाँच करणार आहे. सीएनजी मॉडेलचे नुकतेच ऑटो एक्स्पो दरम्यान अनावरण करण्यात आले.
टाटा पंचची किंमत 6 लाख रुपये ते 9.54 लाख रुपये आहे. टाटा पंच प्योर, एडव्हेंचर, अकम्प्लिश्ड आणि क्रिएटिव्ह या चार मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय काझीरंगा आणि कॅमो सारख्या विशेष एडिशनही उपलब्ध आहेत.