चालू गाडीमध्ये आग लागल्याच्या घटना अनेकदा घडतात. यामध्ये अनेकांना जीवदेखील गमवावा लागतो.
केवळ जुन्याच नाही, तर नवीन वाहनंही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं तुम्ही ऐकलं असेल. म्हणूनच गाडीला आग लागू नये म्हणून काय काळजी घ्यावी हे आपण पाहणार आहोत.
अनेकदा पैसे वाचवण्यासाठी अनेक जण कारचं सर्व्हिसिंग वेळेवर करत नाहीत किंवा कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जाण्याऐवजी लोकल सर्व्हिस सेंटरमध्ये गाडीचं सर्व्हिसिंग करतात.
सर्व्हिसिंग योग्यप्रकारे न झाल्यास गाडीमध्ये बिघाड होण्याची किंवा आग लागण्याची शक्यता निर्माण होते.
पेट्रोल महाग झाल्यानं वाहनात सीएनजी-एलपीजी किट बसवण्याचं प्रमाण वाढलंय. परंतु पैसे वाचवण्यासाठी अनेकजण खासगी सेंटरमधून ते बसवून घेतात. हे काम व्यवस्थित न झाल्यास गाडीमध्ये खराबी होऊन आग लागण्याच्या घटना घडतात.
सीएनजी-एलपीजी फिटींग केल्यानंतर त्यांचं वेळेवर सर्व्हिसिंग करणंही आवश्यक आहे. अन्यथा गॅस लीक होऊन आग लागण्याची शक्यता असते.
गाडीचं तापमान, तसंच इतर गोष्टींकडं लक्ष द्यायला हवं तसेच गाडीत जास्तीच्या ऍक्सेसरीज लावू नयेत. यामुळे गाडीच्या बॅटरीवर लोड येऊन आग लागू शकते.
गाडीची साउंड सिस्टीम किंवा इतर कोणतेही बदल करायचे असतील तर अधिकृत सेंटरमध्ये करावे. त्यामुळे वायरिंग करताना कोणताही निष्काळजीपणा होत नाही.
गाडीत आग लागल्यास गाडीचे दरवाजे अटोमॅटिक लॉक असल्यानं उघडले जात नाहीत. यासाठी गाडीत काही सुरक्षा साधनं बाळगणं गरजेचं आहे.
गाडीची काच फोडण्यासाठी हातोडी, कैची यांसारखी साधनं यावेळी गाडीतून बाहेर पडण्यास फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे आग लागल्यास, गाडीतील व्यक्ती आत अडकून मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते.