इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना चार्जिंग पॉईंटकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
स्कूटर घेऊन बाहेर पडल्यानंतर स्कूटरची बॅटरी कमी असल्यास, आधीच ज्या रस्त्यावरुन जात आहात त्याठिकाणी चार्जिंग पॉईंट आहे की नाही हे तपासा. याबाबत माहिती मिळाल्यानंतरच इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन बाहेर पडा.
स्कूटर चालवताना रायडिंग रेंजकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
सध्याच्या चार्जिंग स्थितीमध्ये बॅटरी किती रेंज देऊ शकते, हे पाहणं महत्त्वाचं आहे. जितका लांब तुमचा प्रवास असेल, त्या हिशोबाने स्कूटर चार्ज नसल्यास समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
केवळ इलेक्ट्रिकच नाही, तर कोणत्याही वाहनासाठी रस्त्यांची स्थिती महत्त्वपूर्ण आहे.
ज्यावेळी इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन बाहेर पडाल, आणि रस्ते खराब असल्यास, खड्डे असल्यास स्कूटरची रायडिंग रेंज कमी होऊ शकते.
त्यामुळे लांब प्रवासात रस्त्यांची स्थिती पाहून प्रवास सुरू करणं फायद्याचं ठरेल.