बजेट 8 लाख रुपयांपर्यंत असेल आणि दिसायला अप्रतिम आणि सर्व गरजा पूर्ण करू शकणारी अशी हॅचबॅक कार शोधत असलात, तर असं कार मॉडेल बाजारात उपलब्ध आहे. या कारचं नाव ह्युंदाई ग्रँड आय 10 निऑस असं आहे. खास लूक आणि विशेष फीचर्स असलेलं या कारचं नवीन व्हर्जन लाँच करण्यात आलं आहे. (फोटो साभार: Hyundai Motor India) ह्युंदाई ग्रँड आय 10 निऑस ही एक हॅचबॅक कार आहे. या कारमध्ये पाच प्रवासी बसू शकतात. या कारची एक्स शोरूम किंमत 5.73 लाख रुपये ते 8.51 लाख रुपयांदरम्यान आहे. दुसरीकडे मारुती स्विफ्टची किंमत 5.99 लाख रुपये, तर बलेनोची किंमत 6.61 लाख रुपयांपासून सुरू होते. (फोटो साभार: Hyundai Motor India) ह्युंदाई ग्रँड आय 10 निऑस या कारचं फेसलिफ्ट व्हर्जन एरा, मॅग्ना, स्पोर्ट्झ आणि अॅस्टा या चार मॉडेलमध्ये खरेदी करता येते. एरा हे बेस मॉडेल, तर मॅग्ना हे सेकंड बेस मॉडेल आहे. या कारच्या मॅग्ना मॉडेलपासून सर्व आवश्यक फीचर्स मिळण्यास सुरुवात होते. फीचर्सच्या बाबतीत ही कार आघाडीवर आहे. मॅग्ना मॉडेलची किंमत 6.62 लाख रुपयांपासून सुरू होते.(फोटो साभार: Hyundai Motor India) या कारच्या बाहेरच्या बाजूस एक नवा फ्रंट ग्रिल, फ्रंट आणि रिअर बंपर, फ्रंट बंपरमध्ये इंटिग्रेटेड Y शेपमधला एलईडी डीआरएल, एक शार्क फिन अँटेना, एलईडी टेल लँप आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आहेत. याशिवाय टॉप मॉडेलमध्ये 15 इंचाच्या डायमंड कट अॅलॉय व्हीलचा नवीन सेट दिला जात आहे.(फोटो साभार: Hyundai Motor India) ही हॅचबॅक कार तुम्ही 2 ड्युएल टोन आणि 6 मोनोटोन कलर्समध्ये खरेदी करू शकता. यात पोलर व्हाइट, टायटन ग्रे, टायफून सिल्व्हर, टील ब्लू, फेयरी रेड आणि स्पार्क ग्रीन नावाचा एक नवीन कलर समाविष्ट आहे.(फोटो साभार: Hyundai Motor India) या कारमध्ये 8 इंचाचा टचस्क्रीन डिस्प्ले, अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी उपलब्ध आहे. याशिवाय टॉप मॉडेलमध्ये क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल, व्हॉइस रेकग्निशन, वायरलेस फोन चार्जर, यूएसबी टाइप सी फास्ट चार्जर, एक नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि फुटवेल लाइटिंगसारखी फीचर्स मिळतात.(फोटो साभार: Hyundai Motor India) नवीन ह्युंदाई ग्रँड आय 10 निऑसमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन असून ते 82bhp पॉवर आणि 114Nm टॉर्क जनरेट करतं. या हॅचबॅकमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. या इंजिनचं पॉवर आउटपुट 68bhp आणि 95 Nm आहे. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. कारचं मायलेज सुमारे 26 kmpl आहे.ग्रँड आय 10 निऑसच्या पूर्वीच्या व्हर्जनला 3 स्टार GNCAP सुरक्षा रेटिंग देण्यात आलं होतं. फेसलिफ्ट मॉडेल्सचं टेस्टिंग अद्याप बाकी आहे. त्यात सहा एअरबॅग्ज, टीएमपीएस, ईएससी, हिल असिस्ट कंट्रोल, ऑटोमॅटिक हेडलँप, आयएसओएफआयएक्स, ईबीडीसह एबीएस आणि रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर यांचा समावेश आहे. त्यामुळे या वेळी या कारचं रेटिंग वाढण्याची शक्यता आहे. (फोटो साभार: Hyundai Motor India)