NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / Car Offers : ‘या’ 5 कारच्या खरेदीवर मिळतीये तगडी सूट, डिस्काउंटच्या पैशात येईल आयफोन 13

Car Offers : ‘या’ 5 कारच्या खरेदीवर मिळतीये तगडी सूट, डिस्काउंटच्या पैशात येईल आयफोन 13

Car Offers in November 2022: तुम्हालाही कार घ्यायची असेल, तर तुम्हाला अतिशय उत्तम संधी आहे. याचं कारण म्हणजे नोव्हेंबर 2022 मध्ये महिंद्रा, मारुती सुझुकी आणि ह्युंदाईसह अनेक कंपन्या त्यांच्या वाहनांवर उत्तम ऑफर देत आहेत. या ऑफर्समुळे तुम्ही आता वाहन खरेदी करून मोठी बचत करू शकता. या सवलतीच्या ऑफरमध्ये रोख सवलत, कॉर्पोरेट सवलत आणि एक्सचेंज फायदे समाविष्ट आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वाहनाला किती सूट मिळत आहे.

15

Mahindra XUV300 (Mhindra XUV300): महिंद्रा आता या शक्तिशाली वाहनावर आपल्या ग्राहकांना 68,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. SUV 300 च्या पेट्रोल व्हेरियंटवर 29,000 रुपयांपर्यंत रोख सवलत उपलब्ध आहे, तर डिझेल व्हेरिएंटवर 23,000 रुपयांपर्यंत कॅश बॅक आहे. याशिवाय कंपनीनं 25,000 रुपयांचे एक्सचेंज बेनेफिट्स, 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज आणि निवडक प्रकारांवर 4,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनस जाहीर केला आहे. XUV300 TurboSport वर कोणतीही ऑफर नाही.

25

मारुती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio): मारुती सुझुकी नोव्हेंबरमध्ये हॅचबॅक सेलेरियोवर 56,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. या सवलतीमध्ये 35,000 रुपयांची रोख सवलत 15,000 रुपये एक्सचेंज बोनस आणि 6,000 रुपये कॉर्पोरेट सूट समाविष्ट आहे. कंपनी LXi, ZXi किंवा ZXi+ प्रकारांवर 41 हजार रुपयांची सूट देईल. कंपनी Celerio च्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर 21,000 रुपयांपर्यंत आणि CNG व्हेरियंटवर 25,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

35

मारुती सुझुकी वॅगन आर (Maruti Suzuki WagonR): तुम्ही नोव्हेंबरमध्ये मारुती वॅगनआर खरेदी केल्यास, तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशनसह ZXi आणि ZXi+ मॉडेल्सवर 41,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यामध्ये, 20,000 रुपयांच्या कॅश डिस्काउंटशिवाय, कंपनी 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 6,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट देत आहे. कंपनी नोव्हेंबर 2022 मध्ये WagonR च्या CNG व्हेरियंटवर 40 हजार रुपयांची सूट देत आहे.

45

टाटा टिआगो आणि टिगोर (Tata Tiago and Tigor): Tata Motors ने Tata Tiago आणि Tata Tigor साठी नोव्हेंबर ऑफर देखील आणल्या आहेत. कंपनी नोव्हेंबर महिन्यात या कारच्या सर्व प्रकारांवर 20,000 रुपयांची रोख सवलत आणि 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. CNG प्रकारावर ग्राहकांना 20,000 रुपयांची सूट आणि 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल.

55

Hyundai Grand i10 Nios: ह्युंदाईनं देखील संपूर्ण नोव्हेंबरमध्ये Grand i10 Nios वर 48,000 पर्यंत सूट देत आहे. कंपनी 1.0-लीटर टर्बो व्हेरियंटवर 35,000 रुपयांपर्यंत, CNG व्हेरिएंटवर 25,000 रुपये आणि 1.2-लीटर पेट्रोल व्हेरिएंटवर 15,000 रुपयांपर्यंत रोख सूट देत आहे. याशिवाय 10,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूटही दिली जात आहे.

  • FIRST PUBLISHED :