NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / DELAGE D12: कार आहे की फायटर जेट? 'या" कारचे Photo पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

DELAGE D12: कार आहे की फायटर जेट? 'या" कारचे Photo पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

DELAGE 15 S 8 या कारनं 1927 आणि ग्रँड प्रिक्सच्या सर्व इव्हेंट्समध्ये वर्चस्व निर्माण केलं होतं. या कारनं सुपरकार्सचं जग बदललं. डेलेज कंपनीच्या या कारनं या काळात दहशत निर्माण केली होती. 1927 साली सुरू झालेला तिचा दरारा आजतागायत सुरू आहे. आता कंपनी जगातील सर्वात वेगवान रोड लीगल कार DELAGE D12 – 2022 च्या रिंगणात आहे. ही कार फायटर जेट आणि फॉर्म्युला वन रेसिंग कारच्या डिझाईनपासून प्रेरित आहे आणि केवळ 2.4 सेकंदात 100 किमी प्रति तास वेग पकडते. कंपनीनं आपली दोन मॉडेल बाजारात आणली आहेत, एक ट्रॅक डिझाईन क्लब आणि दुसरे नॉर्मल रोड डिझाइन जीटी. जाणून घेऊया या कारची इतर खासियत...

16

कारमध्ये 7.6 लीटरचे V12 इंजिन दिलेलं आहे जे स्वतः Delage नं बनवलं आहे. हे इंजिन हायब्रीड असून ते एका खास प्रोग्राम केलेल्या चिपच्या माध्यमातून चालतं. हे इंजिन 990 अश्वशक्तीची थर्मिक पॉवर देतं, म्हणजेच हायब्रिड मोडवर इतकी निर्माण होते. दुसरीकडे एकूण शक्तीच्या बाबतीत हे इंजिन 1100 अश्वशक्ती निर्माण करतं, ज्यामध्ये 110 एचपी प्युअर इलेक्ट्रिक पावर आहे. या गोष्टीमुळं हे इंजिन इतर V12 इंजिनांपेक्षा वेगळे दिसते.

26

या खास कारचे सस्पेंशन देखील खास आहे. याला फॉर्म्युला 1 कारपासून प्रेरित उच्च दर्जाचे कॉन्ट्रॅक्टिव्ह सस्पेन्शन देण्यात आलं आहे. यामुळं तिची राइड खास होईल आणि तुम्हाला फायटर जेटच्या कॉकपिटमध्ये बसल्यासारखं वाटेल. तसेच कंपनीनं प्रथमच यामध्ये ब्रेक कुलिंग फायबर व्हील्स दिले आहेत. हे तंत्रज्ञान हायस्पीड कारसाठी वरदानासारखे आहे. त्यामुळं कार जास्त स्पीड असताना ब्रेक मारल्यावर ब्रेक थंड राहतात आणि पॅड गरम होण्याच्या तसेच डिस्कचे नुकसान होण्याची समस्या सोडवली जाते.

36

या कारच्या डिझाइनची प्रेरणा फॉर्म्युला 1 कारमधून घेतली गेली आहे परंतु तिची आर्किटेक्चर आणि तांत्रिक वैशिष्ट्ये देखील आहेत. फ्रंट क्रॅश बॉक्स आणि मोनोक्यू कार्बन फायबरपासून बनलेले आहेत. या कारच्या संपूर्ण डिझाइनला प्रसिद्ध F1 रेसर Jacques Villeneuve यांनी ओव्हरलूक केलं आहे.

46

कारमध्ये 4 ड्राइव्ह सेटिंग्ज आहेत. शहरात चालवताना हे वाहन पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल आणि इंधनाचा वापर होणार नाही. त्याच वेळी रस्त्यावर चालत असताना ती सामान्य हायब्रिड मोडवर राहील. तसेच जेव्हा ही कार ट्रॅकवर धावेल तेव्हा ती हायब्रिड पर्यायासह जास्तीत जास्त उर्जा निर्माण करेल. तर चौथा पर्याय माय मिक्स ऑप्शन आहे ज्यामध्ये ड्रायव्हर त्याला किती हायब्रिड पॉवर आणि किती इंधन पॉवरची गरज आहे त्यानुसार इंजिनचे आउटपुट स्वत:नुसार सेट करू शकतो. या पर्यायासह कारचं टॉप स्पीड 360 किमी प्रतितास एवढं प्रचंड आहे.

56

ही कार फायटर जेटच्या डिझाइनपासूनही प्रेरित आहे. यामुळे तिच्यात बसण्यासाठी मधोमध जागा आहे. या कारला कोणतेही दरवाजे नसून तिला कॉकपिट स्टाइल देण्यात आली आहे. यामध्ये ड्रायव्हरसोबत आणखी एक व्यक्ती प्रवास करू शकते आणि दोघेही पुढच्या आणि मागच्या सीटवर बसू शकतात. यामुळं कारचं वजन केंद्रस्थानी राहतं आणि कारची रस्त्यावरची पकड आणखी पक्की होते. वाहनाचे स्टीअरिंग देखील फायटर जेटच्या जॉयस्टिकसारखं आहे.

66

डेलेज कंपनी D12 चे फक्त 30 युनिट्स बनवणार आहे. ही खास कार 2 कोटी रुपयांना खरेदी करता येईल. मात्र ही किंमत भारतातील टॅक्समुळं खूप जास्त असेल. त्यामुळं या कारची आयात करणं खूप महाग होईल.

  • FIRST PUBLISHED :