Maruti S Presso: चार व्हॅरिएंट्समध्ये येणारी ही पेट्रोल कार आहे. यात सीएनजी व्हॅरिएंटदेखील आहे. ही कार सहा रंगांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने या कारमध्ये एक लिटर पेट्रोल इंजिन दिलंय. ते 68 PS ची पॉवर व 90 NM टॉर्क जनरेट करतं.
यात 7 इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, एक डिजिटलाइज्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, फ्रंट पॉवर्ड विंडो व कीलेस एंट्री अशी फीचर्स देण्यात आली आहेत. या कारची किंमत 4.26 ते 6.12 लाख रुपयांदरम्यान आहे. पेट्रोल व्हॅरिएंट 24.12 KMPL व सीएनजी व्हॅरिएंट 32.73 KMPL मायलेज देते.
Renault KWID: ही कार दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह येते. 0.8 लीटर पेट्रोल इंजिन 54 PSची पॉवर, तर 1 लिटर इंजिन 68 PSची पॉवर जनरेट करतं.कारमध्ये अँड्रॉइड ऑटो व अॅपल कार प्लेसह 8 इंच टचस्क्रीन इन्फोन्टेन्मेंट सिस्टीम, अॅडजस्टेबल ड्रायव्हिंग सीट व 14 इंचाचं ब्लॅक व्हील आहे.
या कारची किंमत 4.70 लाख ते 6.33 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. ही कार 21 ते 22 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते.
Maruti Alto K 10 : ही देशातली सर्वांत स्वस्त हॅचबॅक कार आहे. या कारमध्ये कंपनीने एक लिटर क्षमतेचं K10c ड्युअलजेट इंजिन, व्हीव्हीटी इंजिन वापरलं आहे. या कारमध्ये कंपनीने 7 इंच टचस्क्रीन इन्फोन्टेनमेंट सिस्टीम दिली आहे. ती अँड्रॉइड ऑटो व अॅपल कार प्लेला सपोर्ट करते.
याशिवाय कीलेस एंट्री, डिजिटलाइज्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल मॅन्युअल अॅडजस्टेबल आउटसाइड रिअरव्ह्यू मिरर अशी फीचर्स मिळतात. सेफ्टी म्हणून कारमध्ये ड्युएल एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशनसह अँटीलॉक ब्रेकिंग सिस्टिम, रिअर पार्किंग सेन्सर सुविधा मिळतात.
या कारची किंमत 3.99 लाख ते 5.96 लाख रुपयांदरम्यान आहे. पेट्रोल मॉडेल 22.05 Kmpl, तर सीएनजी व्हॅरिएंट 33.85Kmpl मायलेज देते.