NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / ऑटो अँड टेक / Auto Expo 2023 : नाद नाही करायचा! पाण्यातही धावणार जबरदस्त कार; भारतीय जवानही हैराण

Auto Expo 2023 : नाद नाही करायचा! पाण्यातही धावणार जबरदस्त कार; भारतीय जवानही हैराण

मुंबई : ऑटो एक्सपो 2023 ग्रेटर नोएडा इथे सध्या सुरू आहे. गाड्यांचा हा एक मेळावाच म्हणायला हवा. येत्या काळात लाँच होणाऱ्या गाड्यांचे मॉडेल यामध्ये पाहायला मिळणार आहेत. या गाड्या लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. या गाड्यांचे फीचर्स आणि किंमती देखील सांगण्यात आल्या आहेत.

16

थार जिम्नी या दोघांपेक्षाही एकदम भारी अशी एक गाडी लाँच होणार आहे. ऑटो एक्सपोच्या निमित्ताने ह्या गाडीचं मॉडेल संपूर्ण जगाला पाहता आलं. ह्या गाडीची ट्रायल जर यशस्वी झाली तर भारतासाठी सर्वात मोठी गोष्ट असणार आहे. याचा फायदा इंडियन आर्मी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना होणार आहे. ही गाडी लाँच झाली तर शत्रूंचं मात्र काही खरं नसेल एवढं नक्की.

26

लवकरच वन विभागात वीर नावाची गाडी दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय सैन्यदलात आणि वन विभागाकडून याची ट्रायल सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. ह्या गाडीचे जबरदस्त फीचर्स आणि असलेली ताकद दोन्ही पाहता जर या गाड्या वन विभागाकडे आणि सैन्यदलाकडे आल्या तर शत्रूंची खैर नाही असं म्हणायला लागेल.

36

या गाडीचे फीचर्स खूप जबरदस्त आहेत. या गाडीचे लाइन आणि कॅमेरे रस्ते आणि शत्रू दोघांवरही अत्यंत चांगली नजर ठेवणार असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

46

वीरची झलक जेव्हा दाखवण्यात आली तेव्हा सगळेच हैराण झाले. शत्रूंच्या मनसुब्यांना सुरुंग लावण्यासाठी ही गाडी सज्ज आहे. सध्या भारतीय सैन्य दलात या गाडीची ट्रायल सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

56

ही गाडी अत्याधुनिक आहे. याशिवाय पूर्ण इलेक्ट्रिक वाहन असणार आहे. एकदा चार्ज केल्यानंतर 500 किमीपर्यंत ही गाडी चालेल. 900 मिलीमीटर खोल पाण्यातही या गाडीची धावण्याची क्षमता असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

66

या गाडीचे लाइट एवढे जबरदस्त आहेत की दुसऱ्या कुठल्याही लाईटची आवश्यकता लागत नाही. अडीच किलो वजन खेचून नेण्याची या गाडीची क्षमता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याला एअर लिफ्ट हुक्स, वेपन माउंट अशा काही सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही सुविधा देण्यात आल्या आहेत. ही गाडी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

  • FIRST PUBLISHED :