नवीन पिढीतील अल्टो भारतीय कार खरेदीदारांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. अनेक वर्षांपासून नेहमीच सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल्सपैकी एक असलेल्या अल्टोने गेल्या महिन्यात विक्रीच्या चार्टमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. ऑक्टोबरमध्ये मारुती सुझुकीने अल्टोच्या 21,260 युनिट्सची विक्री केली.
या यादीत मारुतीचीच कार दुसऱ्या क्रमांकावर आहे. अल्टो नंतर सर्वात जास्त खरेदी वॅगनआर हॅचबॅक आहे. गेल्या महिन्यात वॅगनआरच्या 17,945 युनिट्सची विक्री झाली होती. मारुती WagonR ने 2021 मध्ये सणासुदीच्या महिन्याच्या तुलनेत विक्रीत सुमारे 45 टक्के वाढ नोंदवली आहे.
यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली पुढची कारही मारुतीचीच आहे. स्विफ्ट हॅचबॅक देखील मारुती सुझुकीसाठी भारतातील सर्वोच्च कामगिरी करणारी ठरली आहे. गेल्या महिन्यात स्विफ्टच्या 17,231 युनिट्सची विक्री केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विकल्या गेलेल्या मॉडेलच्या तुलनेत ही विक्री 88 टक्के अधिक आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आलेली नवीन जनरेशन बलेनो भारतात खरेदी केलेल्या टॉप 5 कारमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. मारुती सुझुकीने ऑक्टोबरमध्ये बलेनोच्या 17,149 युनिट्सची डिलिव्हरी केली, जी गेल्या वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या 15,573 युनिट्सपेक्षा जवळपास 10 टक्के जास्त आहे.
टाटा मोटर्सने आपल्या बेस्ट सेलर नेक्सॉन एसयूव्हीसह या यादीत स्थान मिळवले आहे. ही सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक विक्री होणारी 5वी कार आहे. टाटा ने नेकनॉनच्या 13,767 युनिट्सची विक्री केली आहे, ही आतापर्यंत या सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे.