NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / राशीभविष्य / कामामध्ये वेग दाखवाल, ठरवलेल्या योजना सत्यात उतरतील; 11 मार्चचे आर्थिक राशीभविष्य

कामामध्ये वेग दाखवाल, ठरवलेल्या योजना सत्यात उतरतील; 11 मार्चचे आर्थिक राशीभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (11 मार्च 2023) राशिभविष्य

112

मेष (Aries) : संपत्ती आणि आनंदात वाढ होईल. मोठी झेप घेण्याचा विचार कराल. प्रॉपर्टीशी संबंधित प्रकरणांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. करिअर बिझनेस उत्तम राहील. ऑफिसमध्ये मनासारखं काम होईल. बँकिंगमधला रस वाढेल. उपाय : भगवान श्रीकृष्णाला गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवा.

212

वृषभ (Taurus) : बिझनेसमध्ये मोठं उद्दिष्ट गाठाल. दिलेलं प्रॉमिस पूर्ण कराल. महत्त्वाच्या बैठकीत यश मिळेल. करिअरमध्ये तुमच्या कामाचे चांगले परिणाम दिसून येतील. कला क्षेत्रातल्या व्यक्तींना संधी मिळतील. एखादी आनंदाची बातमी मिळेल. कामावर लक्ष राहील. अपेक्षेप्रमाणे नफा होईल. उपाय : चपाती किंवा पावावर मोहरीचं तेल लावून काळ्या श्वानाला खायला द्या.

312

मिथुन (Gemini) : वरिष्ठांचं म्हणणं ऐकाल. कामामध्ये वेग दाखवाल. ठरवलेल्या योजना सत्यात उतरतील. नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. टॅलेंट परफॉर्मन्स सुधारेल. भावनिकतेला आवर घालण्याची गरज आहे. स्वतः प्रयत्न करून नफा कमवाल. उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

412

कर्क (Cancer) : आर्थिक बाजू भक्कम राहील. करिअर बिझनेसही चांगल्या स्थितीत असेल. दिनचर्येत सुधारणा होईल. प्रोफेशनल व्यक्तींचा आधार मिळेल. व्यवस्थापन बळकट होईल. करिअरमध्ये वेग येईल. कामं उद्यावर ढकलणं टाळा. भावनांवर ताबा राहील. उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.

512

सिंह (Leo) : कामाच्या ठिकाणी अडचणी कमी होतील. नोकरदार व्यक्तींसाठी चांगला दिवस. कार्यक्षमता वाढेल. कामकाजाशी संबंधित व्यक्तींशी संबंध सुधारतील. तुमच्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. तथ्यांवर ठाम रहाल. आर्थिक गोष्टींमध्ये स्पष्टता ठेवा. उपाय : हनुमान चालिसाचं सात वेळा पठण करा.

612

कन्या (Virgo) : पार्टनरशिप आणि स्थैर्य याबाबत चांगला दिवस. एखादी नवीन भागीदारी होऊ शकते. व्यावसायिक संबंध अधिक दृढ होतील. जवळचं ध्येय गाठाल. उद्योग-व्यवसाय चांगला राहील. समतोल साधता आल्याने सामंजस्य वाढेल. पद-प्रतिष्ठा वाढेल. उपाय : पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना मुक्त करा.

712

तूळ (Libra) : समजूतदारपणा आणि संवेदनशीलतेने पुढे जात राहा. दुपारपर्यंत अनपेक्षित परिणाम दिसू शकतात. तातडीच्या विषयांवर लक्ष द्या. आर्थिक बाजू चांगली राहील. कोणत्याही कामात घाई करू नका. काम सामान्य राहील. वैयक्तिक खर्चावर नियंत्रण ठेवाल. उपाय : वाहत्या पाण्यामध्ये चांदीचं नाणं टाका.

812

वृश्चिक (Scorpio) : करिअर व्यवसायात धैर्याने पुढे जाल. उत्पन्न अपेक्षेपेक्षा चांगलं राहील. व्यावसायिक बाबींची पूर्तता होईल. नफ्यामध्ये वाढ आणि व्यापारात वृद्धी सुरू राहील. नोकरी-व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती आपले संकल्प पूर्ण करू शकतील. उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. उपाय : भगवान हनुमानाला नारळ अर्पण करा.

912

धनु (Sagittarius) : प्रशासकीय व्यवस्थापनाच्या क्षेत्रात चांगले परिणाम दिसून येतील. ऑफिसच्या कामामध्ये कार्यक्षमता आणि पात्रता वाढेल. ठरवलेल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. व्यावसायिकतेचा लाभ मिळेल. उत्स्फूर्तपणामुळे कामात सक्रियता वाढेल. समंजसपणे काम कराल. अचानक नफा होण्याची शक्यता आहे. उपाय : गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा.

1012

मकर (Capricorn) : व्यवसायात चांगली बातमी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या तर्कशुद्धतेचं कौतुक होईल. विविध मार्गांनी उत्पन्नाची संधी आहे. बिझनेसमध्ये नवीन डील करण्यास घाबरू नका. विविध बाबींमध्ये सामंजस्य वाढेल. उपाय : गणपतीला दूर्वा वाहा.

1112

कुंभ (Aquarius) : व्यवसायामध्ये आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. परदेशात नोकरी करण्याची इच्छा असणार्‍यांना आनंदाची बातमी मिळेल. ऑफिसमध्ये विरोधकांपासून सावध रहा. कुणालाही पैसे उसने देऊ नका. आर्थिक कामात व्यग्र राहाल. उपाय : आईला एखादा गोड पदार्थ द्या.

1212

मीन (Pisces) : आज सर्वच क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी कराल. अगदी आरामात सर्व कामं पार पाडाल. ऑफिसमध्ये विश्वासार्हता आणि सन्मान वाढेल. करिअर व्यवसायाला चालना मिळेल. ध्येय साध्य कराल. शुभ कार्याला गती मिळेल. गरजेच्या कामासाठी खर्च करावा लागेल. उपाय : गणपतीला लाडवांचा नैवेद्य दाखवा.

  • FIRST PUBLISHED :