मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) टीमवर्कचं खरं प्रदर्शन महत्त्वाचं ठरेल. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असलात किंवा विवाहित असलात, तर तुमच्याबद्दल विनाकारण काही गृहीतकं असू शकतात. स्वतःचे लाड करून घेण्याचा दिवस. LUCKY SIGN - A crow
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुमचे ग्रह स्वतःला सिद्ध करण्याची असामान्य संधी तुम्हाला देतील. त्या संधीचा फायदा घ्या. साधेपणामुळे अनेक लाभ होतील. तुमचे पैशांचे व्यवहार स्पष्ट ठेवण्याची सध्या गरज आहे. LUCKY SIGN - A floral pattern
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करणं हे आज कदाचित आव्हानात्मक ठरू शकतं. दिवसाच्या ऊर्जांचं संतुलन साधण्यासाठी सकाळी लवकर ध्यानधारणा करणं चांगलं ठरेल. आधीच संकटात असलेल्याला आणखी त्रास देऊ नका. LUCKY SIGN - Sunset
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही इतर व्यक्तींवर विश्वास ठेवायला हळूहळू सुरुवात करायला हवी. त्यामुळे तुमच्या दैनंदिन आयुष्यात प्रगती होईल. पूर्वी घडलेल्याप्रमाणे काही प्रसंग पुन्हा घडतील. दानधर्म केल्यास समाधानाची भावना निर्माण होईल. LUCKY SIGN - A new chair
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखाद्या मिथकाचा निकाल लागेल आणि वस्तुस्थिती तुमच्या समोर येईल. कामाशी कटिबद्ध राहणं फायद्याचं ठरेल. दिवस बिझी असेल. कामं पुढे न ढकलण्याचा प्रयत्न करा. LUCKY SIGN - Rubber plant
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) जुनी ओळख असलेल्या व्यक्तीला कदाचित भावनिक मदत लागेल. तुमच्या बचतीला अधिक चालना देणं गरजेचं भासू शकेल. आरोग्यविषयक समस्या, खासकरून दातांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, त्यावरचे उपचार पुढे ढकलून चालणार नाही. LUCKY SIGN - A silver spoon
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमची अंतःप्रेरणा तुम्हाला दिवसाच्या व्यवस्थापनाची दिशा देईल. महत्त्वाची मीटिंग तुम्हाला भविष्यातल्या गोष्टींचे स्पष्ट संकेत देईल. दानधर्म करण्याची किंवा समाजकार्याची तुम्हाला खूप इच्छा होईल. LUCKY SIGN - A blue sports bag
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) सकाळच्या वेळात अज्ञात गोष्टीचं ओझं जाणवू शकेल. दिवसाच्या नंतरच्या काळात गोष्टी नियंत्रणात असू शकतील. गैरसमज होऊ न देण्यासाठी संवादात स्पष्टता ठेवा. भावंडाला आधाराची गरज भासेल. LUCKY SIGN - A stained glass
धनु (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुम्हाला जशी हवी आहे, त्या पद्धतीने सुरुवात करण्यासाठी हा सुंदर दिवस आहे. नव्या एखाद्या गोष्टीची जबाबदारी तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. तुमच्या वस्तू सांभाळा. किरकोळ चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. LUCKY SIGN - A new dairy
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमच्यापैकी काही जणांना जवळच्या मित्रांकडून चांगलं संरक्षण मिळतं. तशी गरज असल्याचं वाटत नाही. तुमचा दिवस घरातच जाईल. पेपरवर्क संपवण्यासाठीही हा दिवस कामी येईल. LUCKY SIGN - A red brick wall
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) प्रेमाच्या व्यक्तीशी चांगला संवाद हे आजच्या दिवसाच्या वैशिष्ट्य असू शकतं. एखाद्या Manipulative व्यक्तीपासून अंतर राखा. शेअरिंग आणि बाँडिंगमधली ऊर्जा आजच्या दिवशी मिळेल. तुम्ही काही जणांशी रिकनेक्ट होऊ शकाल. LUCKY SIGN - A bright interior
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) नव्या रूटीनमध्ये तुम्ही फारसे आनंदी नसाल; मात्र ते तुमच्यासाठी चांगलं असेल. आज एखादी नवी गुंतवणूक करून उगाचच धोका पत्करू नका. जुना मित्र अचानक भेटेल किंवा त्याचा कॉल येईल. LUCKY SIGN - Golden star