NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / राशीभविष्य / सूर्याच्या राशीपरिवर्तनाचा राशीचक्रावर काय होणार परिणाम? कोण खूश, कोणाला होणार त्रास

सूर्याच्या राशीपरिवर्तनाचा राशीचक्रावर काय होणार परिणाम? कोण खूश, कोणाला होणार त्रास

सूर्याचे राशी परिवर्तन आज 14 एप्रिल रोजी होत आहे. आज दुपारी 03.12 वाजता सूर्य मेष राशीत प्रवेश करत आहे. 14 मेपर्यंत सूर्य मेष राशीत राहील आणि 15 मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. सर्व 12 राशींवर सूर्याच्या राशीपरिवर्तनाचा परिणाम दिसून येणार आहे. 12 राशीच्या लोकांसाठी हा एक महिन्याचा कालावधी कसा असेल? कोणाला भाग्याची साथ कितपत मिळणार? याविषयी जाणून घेऊया तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांच्याकडून.

112

मेष: सूर्याचे संक्रमण मेष राशीतच होत आहे. याचा या राशीच्या लोकांना संमिश्र परिणाम दिसेल, कारण सूर्याचा राहूसोबतही संयोग होणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सरकारी नोकरी मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या.

212

वृषभ : सूर्याचे संक्रमण तुमच्यासाठी सावधान करणारे आहे. वादविवादापासून दूर राहावे. काही अशुभ वार्ता कळू शकतात. धावपळ करून त्रास होऊ शकतो. कोणाला उधार पैसे दिल्यास नुकसान होऊ शकते.

312

मिथुन: सूर्याचे संक्रमण काही बाबतीत तुमच्यासाठी शुभ परिणाम देईल. अचानक धनलाभ होईल, उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मात्र, कुटुंबात वादविवाद टाळा. प्रेम जीवनात त्रास होऊ शकतो.

412

कर्क : सूर्याच्या राशीत बदलामुळे कर्क राशीच्या लोकांच्या व्यवसायात प्रगती होईल, त्यांच्या कामात यश येईल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. तुमची कीर्ती वाढेल.

512

सिंह: सूर्याच्या संक्रमणामुळे पूजा आणि सामाजिक क्षेत्रातील कामांमध्ये तुमची आवड निर्माण होईल. कठीण परिस्थितीतही यश मिळेल, संयमाने काम करा. प्रवासातून लाभ होण्याची शक्यता आहे.

612

कन्या : मेष राशीत सूर्य गोचर असल्यामुळे औषध आणि अग्निपासून सावध राहावे लागेल. वैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. तुमची प्रतिष्ठा दुखावली जाऊ शकते.

712

तूळ: सूर्याच्या आशीर्वादाने तुमच्या व्यवसायात प्रगती होईल, परंतु तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. रागामुळे काम बिघडेल. भागीदारीत कोणतेही काम आता टाळा.

812

वृश्चिक : सूर्याचा प्रभाव सकारात्मक राहील. सरकारी नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. कोर्ट-केसमध्ये यश मिळेल. नवीन नोकरीही मिळू शकते. विरोधक सहकार्य करतील.

912

धनु: सूर्याचे संक्रमण तुमच्यासाठी सामान्य राहील. मालमत्तेचा वाद मिटू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल, पण तरीही मन अस्वस्थ राहील. परीक्षेत मोठ्या कष्टाने यश मिळेल.

1012

मकर : सूर्यदेवाच्या आशीर्वादाने तुमचा व्यवसाय चांगला चालेल, पण प्रवासात सामान चोरीला जाण्याची भीती आहे. सुरक्षिततेने प्रवास करा. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.

1112

कुंभ : रवि संक्रमणामुळे जुनी रखडलेली कामे यशस्वी होतील. तुमचा प्रभाव वाढेल. सरकारी नोकरीसाठी वेळ अनुकूल आहे. परदेशात नोकरीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कुटुंबात वादविवाद होऊ शकतात.

1212

मीन: सूर्याच्या राशी बदलामुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. गुप्ततेने काम केल्यास यश मिळेल. सुख-सुविधांवर पैसा खर्च होईल. डोळ्यांच्या समस्यांमुळे त्रास होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :