NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / राशीभविष्य / Numerology: व्यवसायात भागीदार म्हणून हे दोन जन्मअंक असणाऱ्यांचं चांगलं जुळतं

Numerology: व्यवसायात भागीदार म्हणून हे दोन जन्मअंक असणाऱ्यांचं चांगलं जुळतं

क्रमांक 2 असलेल्या व्यक्तींनी क्रमांक 8 असलेल्या व्यक्तींसोबत व्यवसायात भागीदारी केली तर त्यांना उत्तम यश देऊ शकते. या क्रमांकाच्या जोडप्यांनी इतर लोकांकडून आपला गैरवापर तसेच दिशाभूल केली जाऊ नये, याबाबत सावध राहावं.

16

क्रमांक 2 हा क्रमांक 8 आणि 9 शी किती सुसंगत आहे? 2 या क्रमांकाचा स्वामी चंद्र आहे. क्रमांक 8 : क्रमांक 8 आणि क्रमांक 2 असलेल्या व्यक्तींचे संबंध प्रामाणिक आणि निस्वार्थी असतात. या अंकांच्या व्यक्तींमध्ये एकमेकांविषयी आदर आणि सहानूभुती असते. त्यामुळे क्रमांक 8 आणि 2 हे एकमेकांसाठी सुसंगत मानले जातात.

26

क्रमांक 8 चा स्वामी शनि तर क्रमांक 2 चा स्वामी चंद्र आहे, हे दोघंही भगवान शंकराचे भक्त मानले जातात. त्यामुळे भगवान शंकराची आराधना केली तर या अंकांच्या लोकांना सहजपणे ग्रहांची कृपादृष्टी लाभते.

36

क्रमांक 2 असलेल्या व्यक्तींनी क्रमांक 8 असलेल्या व्यक्तींसोबत व्यवसायात भागीदारी केली तर त्यांना उत्तम यश देऊ शकते. या क्रमांकाच्या जोडप्यांनी इतर लोकांकडून आपला गैरवापर तसेच दिशाभूल केली जाऊ नये, याबाबत सावध राहावं. या अंकांच्या व्यक्तींनी समाजसेवेचं कार्य अविरत सुरू ठेवावं. तसेच या व्यक्तींनी शक्यतो निळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा.

46

क्रमांक 9 : 9 या अंकाचा संबंध मंगळ ग्रहाशी आहे. त्यामुळे या अंकाच्या व्यक्ती मानवतावादी आणि लोकप्रिय असतात. पण जेव्हा या अंकाच्या व्यक्ती 2 या अंकाशी जोडल्या जातात, तेव्हा त्या गोंधळून जातात.

56

9 या अंकाच्या व्यक्ती तर्कशुद्ध निर्णय घेण्यात कुशल असतात तर 2 अंकाच्या व्यक्ती व्यावहारिक विचारांपासून दूर असतात त्यामुळे विवाहित आणि अविवाहित जोडप्यांमध्ये वाद निर्माण होतात. तसंच 2 आणि 9 अंकाच्या व्यक्ती दोष स्वीकारण्याऐवजी त्यांच्या कृतीचे समर्थन करतात.

66

2 आणि 9 या अंकांच्या व्यक्तींनी अंकशास्त्राच्या विश्लेषणानुसार कृती केल्यास त्यांच्यातील संबंध चांगले होऊ शकतात. या अंकांशी संबंधित व्यक्तींनी कायदा, वैद्यकीय, दागिने, ज्योतिष, वास्तुशास्त्र सल्लागार, गॅस व्हेसल्स, प्रॉपर्टी डिलर्स, पेट्रोल आणि शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या उद्योग व्यवसायांमध्ये भागीदारी केली तर ती यशस्वी होऊ शकते.

  • FIRST PUBLISHED :