NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / कृषी / TCS ची नोकरी सोडून पठ्ठ्यानं सुरू केली शेती, आज करतोय लाखोंची उलाढाल

TCS ची नोकरी सोडून पठ्ठ्यानं सुरू केली शेती, आज करतोय लाखोंची उलाढाल

विकास रणवां यांनी ऑरगॅनिक शेतीची वाट धरली. विकास आता सुमारे चाळीस बिघा क्षेत्रात मोहरी, गहू आणि तांदळाची लागवड करत आहे.

18

टीसीएस सारख्या कंपनीमध्ये नोकरी करणं म्हणजे प्रतिष्ठेचं मानलं जातं. मात्र अशी नोकरी सोडून चक्क शेती करण्याचा निर्णय एका शेतकऱ्याने घेतला आहे. त्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्याचं चर्चा आज संपूर्ण गावात होत आहे.

28

विकास रणवां यांनी ऑरगॅनिक शेतीची वाट धरली. विकास आता सुमारे चाळीस बिघा क्षेत्रात मोहरी, गहू आणि तांदळाची लागवड करत आहे. विकास यांनी गेल्या 10 वर्षांत कोणत्याही रासायनिक खतांचा वापर केलेला नाही.

38

रासायनिक खतं न वापरताही ते चांगले उत्पादन घेत आहेत. सेंद्रिय धान्याचे दरही चांगले मिळत आहेत. सेंद्रिय खतांच्या आधारे 14.5 क्विंटल प्रति बिघा गव्हाचे उत्पादन घेतल्याचे ते सांगतात.

48

याच्या किंमतही बाजारभावापेक्षा एक हजार रुपये अधिक असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. शेणाऐवजी बायो-कंपोझर वापरून चांगले कंपोस्ट खत तयार करता येते.

58

बायो डी-कंपोझरचा वापर शेतातील अवशेषांचे त्वरित कंपोस्टिंग आणि मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि वनस्पतींचे रोग टाळण्यासाठी गांडुळांच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी केला जातो. गाईच्या शेणातून सूक्ष्म सेंद्रिय जीवाणू काढून ते तयार केले जाते.

68

पाण्यातील बदल आणि हवामानातील चढउतार यामुळे शेती करणे हे सर्वात आव्हानात्मक काम असल्याचे विकास सांगतात. शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीसोबतच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून नाविन्याकडे लक्ष दिल्यास चांगले परिणाम दिसून आले आहेत.

78

सरकार नॅनो युरियावर भर देत आहे जे शेतीसाठी खूप चांगलं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. शेतीमध्ये देशी पद्धतींसोबतच प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करण्यावर भर देणे आवश्यक आहे.

88

या शेतीसोबत ते पशुपालन देखील करतात. त्यांच्याकडे १६ गाई आहेत. त्यांचं दूध आणि त्यापासून तयार केलेलं तूप अशा दोन्ही गोष्टी विकून त्यातूनही त्यांना मोठा नफा होतो.

  • FIRST PUBLISHED :