NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / कृषी / गुलाबाच्या शेतीनं बदललं कुटुंबाच नशिब! जगण्यासाठी संघर्ष करणारे आता कमतायेत लाखो रुपये

गुलाबाच्या शेतीनं बदललं कुटुंबाच नशिब! जगण्यासाठी संघर्ष करणारे आता कमतायेत लाखो रुपये

गुलाबासारखे सुंदर फूल दुसरे नाही, असं म्हणतात. याचं नाव जरी जिभेवर आलं तरी लोकांचे चेहरे फुलतात. क्वचितच असा कोणी असेल ज्याला गुलाबाच्या सुगंधाची मोहिनी पटली नसेल. कदाचित त्यामुळेच या फुलाला बाजारातील इतर फुलांपेक्षा जास्त मागणी आहे. याची शेती केली तर तुम्हीही मालामाल होऊ शकता. याचं जीवंत उदाहरण आहे, रांचीतील टिकराटोली गावात. येथे एक कुटुंब गुलाबाची लागवड करून चांगला नफा कमवत आहे.

14

हे गुलाबाचे शेत रांचीच्या नगर ब्लॉकमधील टिकराटोली गावात आहे. हे शेत कलावती देवीचे आहे. एक काळ असा होता की इतर शेतकऱ्यांप्रमाणे कलावतीचे कुटुंबही भाजीपाला आणि इतर पिकांच्या लागवडीवर जगत होते. मात्र, या बदलत्या युगात या कुटुंबानेही कृषी क्षेत्रात नवा प्रयोग केला.

24

कलावती यांचा मुलगा राहुल कुमार याने सोशल मीडियाच्या मदतीने माहिती गोळा केली आणि गुलाबाच्या फुलातून रोजगार वाढवण्याचे स्वप्न पाहिले. स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे, महाराष्ट्रातून 2 हजार गुलाबाची रोपे घेऊन एक नवी इनिंग सुरू केली. पहिल्या वर्षी खूप अडचणी आल्या. नफा नक्कीच झाला, पण जास्त नफा कसा होऊ शकतो, हे मलाही शिकायला मिळाले, असं राहुल सांगतो.

34

आज कलावतीदेवींनी महिला समितीच्या मदतीने आणि स्वतःच्या गुंतवणुकीतून 25 डेसिमल जमिनीवर गुलाबाची लागवड केली आहे. तुम्हाला इथे सर्वत्र गुलाब पाहायला मिळतील. या बागेतून रोज गुलाब तोडून आणले जातात. नंतर व्यवस्थित पॅक करुम बाजारात पाठवत असल्याचे राहुलने सांगितले. सध्या जेवढी मागणी आहे तेवढा पुरवठा करणे कठीण असल्याचंही त्याने सांगितले.

44

गुलांबांची पॅकेज 200 रुपये प्रति पॅकेट दराने व्यापाऱ्याला विकले जातात. एका पॅकेटमध्ये 12 गुलाबाची फुले असतात. संपूर्ण कुटुंब या नवीन व्यवसायाचा विस्तार करण्यात व्यस्त आहे. या व्यवसायातून उत्पन्न मिळत आहे. ते करण्यात एक वेगळाच आनंद असतो. या रोजगारासाठी JSLPS ने कलावती देवींच्या जमिनीवर ठिबक सिंचन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

  • FIRST PUBLISHED :