उन्हाळा सुरू होताच सर्वांना आंब्याचे वेध लागतात. पुण्यातील मार्केटयार्डमध्ये हापूस आंबा दाखल झाला आहे.
मार्केट यार्ड येथील गणेश फ्रुट या गाळ्याचे मालक अरविंद मोरे यांच्याकडे गणपतीपुळे येथील हापूस आंब्याच्या पेट्या आल्या होत्या.
या आंब्याची लिलावात बोली लावण्यात आली. त्यामध्ये पाच डझन आंब्यासाठी तब्बल 21 हजारांची बोली लागली.
येत्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये आंब्याची आवक वाढली तर आंब्याचा रेट हा 12000 ते 15000 रुपये पेटी या दरानं तो उपलब्ध होईल, अशी माहिती गाळा मालक अरविंद मोरे यांनी दिली.
सध्या कमी प्रमाणामध्ये हापूस आंबा बाजारामध्ये येत असून हा सीझनचा हा सुरुवातीचा अंबा आहे.
सध्याचे हवामान पाहता यावेळेस हापूस आंबा हा सर्वसामान्य नागरिकांसाठी लवकरात लवकर उपलब्ध होईल आणि त्यांना लवकरात लवकर कमी भावामध्ये हापूस आंबा मार्च महिन्यामध्ये उपलब्ध होऊ शकेल,असं मोरे यांनी सांगितलं.