अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पडद्यामागून मोठी राजकीय घडामोड सुरू
**मुंबई, 23 ऑगस्ट :**पंतप्रधान मोदी जेव्हा भाषण करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे सुद्धा बसलेले होते. भाषणात मोदींनी सांगितलं सत्ता आल्यावर फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. अमित शहांनी सुद्धा तेच सांगितलं. मग त्यावेळी आक्षेप का घेतला नाही. त्याच वेळी फोन का केला नाही. त्याचवेळी भेटला का नाही, तुम्ही मला वेगळं सांगितलं आणि आता वेगळ बोलत आहात. निकाल लागल्यावर सगळंच कसं आठवलं? असा थेट सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारला. शस्त्रक्रियेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. रवींद्र नाट्यमंदिर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा ठाकरी तोफ धडाडली. यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. ‘शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली. त्यानंतर दोघांनी फारकत घेतली. काय तर म्हणे, अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची घोषणा केली होती. मला आजही आठवतं मी त्यावेळी बैठकीला हजर राहत होतो. कधी घरी बैठका व्हायच्या किंवा सेंटार हॉटेलमध्ये बैठक व्हायची. त्यावेळी मनोहर जोशी, गोपीनाथ मुंडे असे अनेक नेते हजर होते. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे ठरलं होतं. जर हे ठरलं होतं तर मग 2019 ला मागणी कशीच करू शकता. शिवसेनेचे आमदार कमी आले होते. चार भिंतीमध्ये कमिटमेंट घेतली होती. त्या चार भिंतीमध्ये होत तरी कोण, एकतर हे खोटं बोलताय नाहीतर ते खोट बोलताय. मुळात तुम्ही मागितलं कसं, ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री मग तुम्ही मागताच कसे? असा सवालच राज ठाकरेंनी केला. पंतप्रधान मोदी जेव्हा भाषण करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे सुद्धा बसलेले होते. भाषणात मोदींनी सांगितलं सत्ता आल्यावर फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. अमित शहांनी सुद्धा तेच सांगितलं. मग त्यावेळी आक्षेप का घेतला नाही. त्याच वेळी फोन का केला नाही. त्याचवेळी भेटला का नाही, तुम्ही मला वेगळं सांगितलं आणि आता वेगळ बोलत आहात. निकाल लागल्यावर सगळंच कसं आठवलं. मग काय काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. मग लोकांनी मतदान कुणाला केलं. असं समजूया शिवसेना आणि भाजपला मतदान करणारे लोकं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करणारी लोकं. लोकांना असं वाटत असेल आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार नको म्हणून तुम्हाला मतदान केलं आणि तुम्हीच त्यांच्यासोबत कसं गेला? हिंमत कशी होते. मतदानांची किंमत कशी केली नाही. जोपर्यंत लोक या सरकारला विचारत नाही, तोपर्यंत काहीच होणार नाही, अशी टीकाही राज ठाकरेंनी केला.