JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / IPL Auction 2021 Live : कोण आहे मुंबई इंडियन्सचा नवा खेळाडू अ‍ॅडम मिल्न?

IPL Auction 2021 Live : कोण आहे मुंबई इंडियन्सचा नवा खेळाडू अ‍ॅडम मिल्न?

न्यूझीलंडचा 28 वर्षांचा फास्ट बॉलर असलेला मिल्नची (Adam Milne) मुंबई ही दुसरी आयपीएल टीम आहे. यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून खेळला आहे.

जाहिरात

Photo Courtesy sydney thunder

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

चेन्नई, 18 फेब्रुवारी : आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) आगामी सिझनसाठी पहिली खरेदी केली आहे. मुंबई इंडियन्सनं या सिझनसाठी न्यूझीलंडचा फास्ट बॉलर अ‍ॅडम मिल्न (Adam Milne) याला 3 कोटी 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं आहे. मुंबई इंडियन्सचा आजवरचा इतिहास पाहिला तर अंतिम 11 मध्ये मुंबईनं नेहमीच दोन विदेशी बॉलर्सना खेळवलं आहे. मुंबईनं या लिलावापूर्वी ट्रेंट बोल्टचा अपवाद वगळता अन्य सर्व विदेशी फास्ट बॉलर्सना रिलीज केलं होतं. त्यामुळे त्यांना एक फास्ट बॉलर हवा होता. कोण आहे अ‍ॅडम मिल्न? न्यूझीलंडचा 28 वर्षांचा फास्ट बॉलर असलेला मिल्नची मुंबई ही दुसरी आयपीएल टीम आहे. यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) कडून खेळला आहे. मिल्ननं 21 T20 मध्ये न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामध्ये त्यानं 7.42 च्या इकॉनॉमी रेटनं 25 विकेट्स घेतल्या आहेत. IPL 2021 Auction: बांगलादेशी खेळाडूमुळे प्रीती आणि शाहरुखमध्ये टशन; कोण जिंकलं? फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 2010 साली पदार्पण केलेल्या न्यूझीलंडच्या फास्ट बॉलरनं त्याच वर्षी पाकिस्तानविरुद्ध झालेल्या टी-20 मॅचमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र त्याच्या आजवरच्या कारकीर्दीला दुखापतीचा नेहमीच फटका बसला आहे. तो 2018 साली न्यूझीलंडकडून शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळला होता. IPL Auction 2021 Live : गंभीरचा सल्ला धोनीनं मानला! ‘या’ ऑलराऊंडरला केलं खरेदी मिल्नेकडं 150 किमी प्रतितास वेगानं बॉलिंग करण्याची क्षमता आहे. त्याच्या याच क्षमतेमुळे मुंबई इंडियन्सनं त्याची निवड केली असावी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या