JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Weight Gain : सडपातळ शरीरामुळे व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतोय? हे काम केल्याने महिनाभरात वाढेल वजन!

Weight Gain : सडपातळ शरीरामुळे व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतोय? हे काम केल्याने महिनाभरात वाढेल वजन!

एखाद्या व्यक्तीचे वजन सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल तर त्याला काही आजर किंवा इतर समस्या आहेत असा त्याचा अर्थ असा होतो. परंतु कोणतीही समस्या नसेल तरी ते हानिकारक असते.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जुलै : शरीरातील प्रत्येक अवयवाचा विकास आवश्यक आहे, तरच शरीर निरोगी राहते. पण शरीराचे वजन अनुकूल नसेल तर ती धोक्याची घंटा असते. आजच्या काळात लठ्ठपणा हा एक मोठा आजार बनत चालला असला तरी काही लोक असे आहेत ज्यांचे शरीर लाकडासारखे बारीक दिसते. एखाद्या व्यक्तीचे वजन सामान्य प्रमाणापेक्षा कमी असेल तर त्याला काही आजर किंवा इतर समस्या आहेत असा त्याचा अर्थ असा होतो. परंतु कोणतीही समस्या नसेल तरी ते हानिकारक असते. सामान्यपणे एखाद्या व्यक्तीचे वजन किती असावे यासाठी त्या व्यक्तीच्या वजनाला लांबीच्या वर्गाने भागल्यानंतर जो रिझल्ट समोर येतो ते त्याचे उत्तर असते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे वजन 68 किलो आणि उंची 165 सेमी असेल तर त्या व्यक्तीचा बीएमआय 68 बाय 1.65 चा वर्ग असेल, जो 24.98 होतो. एखाद्या प्रौढ व्यक्तीचा BMI 25 च्या आसपास असेल तर त्याचे वजन योग्य मानले जाते. परंतु जर एखाद्याचा BMI 18 च्या खाली असेल तर त्याचे वजन कमी मानले जाते. यासाठी सर्वप्रथम वजन कमी झाल्यामुळे कोणताही आजार तर नाही ना हे पाहावे लागेल. आजार असल्यास त्यावर उपचार करता येऊ शकतात. परंतु वजन कमी होण्यामागे दुसरे कोणतेही कारण नसेल आणि अन्न सुद्धा नीट खाल्ले जात असेल तर याचा अर्थ असा होतो की एखादी व्यक्ती चुकीच्या पद्धतीने खात आहे. यासाठी शास्त्रीय पद्धतीने काही उपयांचा अवलंब करणे आवश्यक आहे. वजन वाढवण्यासाठी सोप्या टिप्स पौष्टिक आहार घ्या मेयो क्लिनिकनुसार शरीरात कोणताही आजार नसेल आणि तरीही वजन सामान्यपेक्षा कमी असेल तर पौष्टिक अन्न खाणे आवश्यक आहे. यासाठी संपूर्ण धान्य, अंकुरलेले धान्य, दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी इत्यादींचे सेवन वाढवा. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त फास्ट फूड किंवा जंक फूड खावे. तळलेल्या वस्तूंपासून कायम दूर राहा. दिवसातून 5-6 वेळा खा वजन वाढत नसेल तर दिवसातून 5 ते 6 वेळा खा. तुम्हाला कधी भूक लागतेय यावर लक्ष ठेवा आणि त्याच वेळी खाण्याचा नियम बनवा. जर तुम्ही वारंवार खाल्ले तर उर्जेची कमतरता भासणार नाही आणि वजनही वाढेल. अन्नात अतिरिक्त गोष्टींचा समावेश वजन वाढत नसेल तर याचा अर्थ तुम्हाला अधिक पोषणाची गरज आहे. यासाठी अन्नामध्ये अतिरिक्त गोष्टींचा समावेश करा. नियमित ब्रेड, भात याशिवाय चीज, बटर, कडधान्य टोस्ट, दूध इत्यादींचे सेवन वाढवा. अधिक उर्जेसाठी चॉकलेट देखील योग्य आहार आहे. मात्र त्याचे जास्त सेवन करू नका. बटाटे आणि सूप जास्त प्रमाणात घ्या. मुलांना शेक आणि स्मूदी द्या मुलांचे वजन वाढत नसेल तर तुम्ही जास्त शेक किंवा स्मूदी वापरू शकता. यासाठी केळी, ओट्स इत्यादी शेक फायदेशीर ठरतील. हे लक्षात ठेवा की जास्त कॅलरी असलेल्या वस्तू आहारात घेऊ नका. जेवणापूर्वी पाणी पिऊ नका जेवण करण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पोटात जागा राहणार नाही. त्यामुळे नंतर तुम्ही फारसे जेवणार नाही. जेवणापूर्वी किंवा जेवणादरम्यान कोणत्याही प्रकारचे द्रवपदार्थ घेऊ नका. कारण त्यामुळे तुमचे पोट भरलेले असेल आणि तुम्ही योग्य प्रमाणात अन्न खाऊ शकणार नाहीत. वजन वाढवण्यासाठी व्यायाम व्यायाम करणे देखील खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही व्यायाम केला नाही तर अचानक वजन वाढल्यानंतर शरीर लटकू लागेल. पोटावर चरबी जमा होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही अधिक लठ्ठ व्हाल, जे अधिक हानिकारक असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या