JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / VIRAL VIDEO: लॉकडाऊनमध्ये मिरवणुकीचं आयोजन, विरोध केला म्हणून नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ला

VIRAL VIDEO: लॉकडाऊनमध्ये मिरवणुकीचं आयोजन, विरोध केला म्हणून नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ला

नांदेड येथील गुरुद्वारा परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नांदेड, 29 मार्च : नांदेड येथील गुरुद्वारा परिसरात पोलिसांवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जमावाने पोलीस अधीक्षकाच्या वाहनावर हल्ला करत गाडीची तोडफोड केली. होळीच्या दिवशी गुरुद्वारातून हल्लाबोल मिरवणूक निघते मात्र सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये संचार बंदी आणि लॉकडाऊन लागू आहे. तेव्हा गर्दी करू नये असे प्रशासनाचे आदेश होते. (Attack on Police in Nanded) त्यामुळे गुरुद्वारा बोर्डानेदेखील ही मिरवणूक रद्द केली होती. परंतू सायंकाळी हल्ला बोल मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने गर्दी करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा पर्यंत केला. पण जमावाने पोलिसांवर हल्ला केला. यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणात आरोपीविरुद्ध कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दिली. सध्या परिस्थिती नियंत्रणात  असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त या भागात लावला आहे. हे ही वाचा- पुण्यात खासगी रुग्णालयांतील 80 % खाटा कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश

संबंधित बातम्या

सध्या राज्यभरात मोठ्या प्रमाणात कोरोणाची रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या (Corona Patients) संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होते आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध लावण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरोनाची संख्या वाढत असल्याने निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या