JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / मुंबई-ठाण्याहून खारघरचा प्रवास आता सुसाट, 30 मिनिटांत अंतर कापणार

मुंबई-ठाण्याहून खारघरचा प्रवास आता सुसाट, 30 मिनिटांत अंतर कापणार

पुढील तीन वर्षात हा प्रकल्प उभा करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यामुळे आता मुंबई किंवा ठाण्याहून नवी मुंबईत येणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

जाहिरात

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई : मुंबई-ठाण्याहून तुम्हाला नवी मुंबईत खारघर किंवा नवी मुंबई विमातळाच्या दिशेनं जाण्यासाठी आता खूप वेळ थांबाव लागणार नाही. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे. याच दृष्टीकोनातून सिडको एक नवा प्रकल्प आणत आहे. मुंबई ठाण्याहून खारघर अवघ्या 30 मिनिटांत अंतर पार करता येणार आहे. ठाणे, बेलापूर, पामबीच आणि शीव पनवेल या मार्गावरील ट्रॅफिक कमी करण्यासाठी सिडको महामंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी खारघर तुर्भे दरम्यान लिंकरोड तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 2 हजार 195 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. पुढील तीन वर्षात हा प्रकल्प उभा करण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यामुळे आता मुंबई किंवा ठाण्याहून नवी मुंबईत येणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. अवघ्या 30 मिनिटांत हे अंतर कापता येणार आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. काय वैशिष्ट्यं? तुर्भे-खारघर लिंकरोड हा चौपदरी असणार आहे. याची लांबी साधारण 5.49 किमी असेल. यात १.९६ किती लांबीचा बोगदा असणार आहे. सगळ्या विभागाच्या परवानगी मिळाल्यानंतर कामाला सुरुवात केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं. शीव पनवेल महामार्गावर दिवसाला दोन लाखहून अधिक वाहानं धावतात, त्यामुळे वाहतूक कोंडी जास्त होते. मुंबईहून येणाऱ्यांना या मार्गावरून यावं लागतं. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी कमी या प्रकल्पामुळे कमी होईल असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या