मुंबई, 24 सप्टेंबर : लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती वाढलेल्या आहेत. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या माहितीनुसार दिल्ली सराफा बाजारात सोन्याची किंमत 330 रुपयांनी वाढलीय. सोनं आता 39,020 रुपये प्रति 10 ग्रॅम झालंय. सोमवारी ( 23 सप्टेंबर ) 24 कॅरेट सोनं 38,690 रुपये प्रति 10 ग्रॅम होतं. दरम्यान, चांदीच्या किमतीतही वाढ झालीय. चांदीचा दर 730 रुपयांनी वाढून 48,720 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय. सोमवारी चांदी 47,990 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयाॅर्कमध्ये सोन्याची किंमत 1,522.60 डाॅलर प्रति औंस आणि चांदीची 18.57 डाॅलर प्रति औंस आहे. दोन दिवसांनी मारुती सुझुकी कार होणार ‘इतक्या’ स्वस्त सोन्याच्या दरात वाढ होण्याचं कारण HDFC सिक्युरिटीजचे मुख्य सल्लागार देवर्ष वकील म्हणाले, सणासुदीनिमित्त सोन्याची मागणी वाढल्यानं किमती वाढल्यात. पितृपक्ष 28 सप्टेंबरला संपतोय. त्यानंतर सोन्याची विक्री वाढण्याची आशा आहे. कसं ओळखायचं अस्सल सोनं? दातांची टेस्ट - तुम्ही दातांमध्ये सोनं दाबून ठेवलंत तर ते खरं असेल तर दातांवर निशाणी दिसेल. सोन्याचे दागिनेही 24 कॅरेटचे तयार करत नाहीत. त्यात इतर धातू मिसळावे लागतात. तुमच्या PF अकाउंटमध्ये लवकरच येणार जास्त पैसे, ‘असं’ तपासा तुमचं खातं पाण्याची टेस्ट - आणखी एक सोपी पद्धत म्हणजे पाण्याची टेस्ट. त्यासाठी एका खोल भांड्यात 2 ग्लास पाणी टाका आणि त्यात सोन्याचे दागिने बुडवा. सोनं तरंगलं तर ते खरं नाही. ते खाली गेलं तर खरं आहे, समजावं. सिरॅमिक थाळी - बाजारातून पांढऱ्या रंगाची ही थाळी आणा. सोनं त्या थाळीवर घासा. थाळी काळी पडली तर समजा सोनं खोटं आहे आणि चांगले रंग थाळीवर चढले तर ते सोनं असली आहे. बँकेत नोकरीची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी करा अर्ज चुंबक टेस्ट - तज्ज्ञांच्या मते दुकानातून चुंबक घ्या आणि सोन्याच्या दागिन्यांवर लावा. सोनं त्यावर चिकटलं तर ते असली नाही. चिकटलं नाही तर ते अस्सल सोनं आहे. SPECIAL REPORT: भाजपच्या मेगाभरतीला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर, सत्ताधाऱ्यातील नाराजांना आमंत्रण