मुंबई, 13 सप्टेंबर : बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचं (Sushant Singh Rajput) निधन होऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतने त्याच्या ब्रांद्यातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अचानक झालेल्या या धक्कादायक निधनाने बॉलिवूडसह संपूर्ण देशच हादरला होता. सुशांतच्या निधनानंतर अनेक चर्चा, तपास, चौकशा सुरू झाल्या. अनेकांनी सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या केली असल्याचंही म्हटलं होतं. आता अचानक तासाभरापासून ट्विटरवर CBI CONFIRM SSR MURDER हा टॅग ट्रेंड होऊ लागला आहे. CBI CONFIRM SSR MURDER हा टॅग ट्विटरवर ट्रेंड होत असला, तरी याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. CBI Custody of Pithani 4 SSR हा टॅगही ट्विटरवर ट्रेंड होत आहे. सिद्धार्थ पिठानी हा सुशांतचा जवळचा मित्र आणि रूममेट असल्याचं सांगितलं जातं. तो सुशांतचा क्रिएटिव कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. रियाने सांगितल्यानुसार ती सुशांतच्या घरी राहायला जाण्याच्या आधीपासूनच सिद्धार्थ पिठानी सुशांतसह राहत होता.
बिहार सरकारने या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्राने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI करणार आहे. सुशांत सिंहचे वडिल केके सिंह यांनी (वय-74) यांनी 28 जुलैला अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंबीय अशा सहा जणांविरुद्ध पाटणा येथील राजीव नगर पोलीसमध्ये एफआयआर नोंदवली आहे. सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका रिया चक्रवर्तीवर ठेवण्यात आला आहे. केके सिंह यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.