मुंबई, 06 जुलै: सोनाली बेंद्रेनं फेसबुक पोस्ट टाकली आणि तिचे चाहते चिंतेत पडले. कारण तिला हायग्रेड कॅन्सर झाल्याचं तिनं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जाहीर केलं. सोनालीच्या चाहत्यांना ही पोस्ट वाचून जेवढा धक्का बसला तेवढाच धक्का, किंबहूना त्याहून थोडा जास्तच मोठा धक्का सिनेसृष्टीतील तिच्या मित्र- मैत्रिणींना बसला. ट्विटरवरील तिच्या पोस्टवर शेकडो लोकांनी तिला ‘गेट वेल सून’च्या शुभेच्छा दिल्या. दिव्या दत्तापासून ते शोभा डेपर्यंत आणि माधुरी दीक्षितपासून ते ऋषी कपूरपर्यंत साऱ्यांनीच तिला लवकरात लवकर बरं होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री दिव्या दत्ताने सोनालीसाठी एक खास लेखही लिहिला. या लेखात दिव्याने तिची सिनेसृष्टीतील दिव्याची पहिली मैत्रीण सोनाली होती हे सांगितले. दिव्याने हा लेख ट्विट करत सोनालीला धिटाने लढण्यास सांगितले. दिव्यासारखेच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सोनाली एक लढवय्यी असून ती या आजाराजून लवकर बरी होईल असा संदेश ट्विटरवर लिहिला. दिव्याचे हे ट्विट रिट्विट करत सोनाली म्हणाली की, ‘दिव्या तू मला रडवलंस.’ मनिषा कोईरालानेही सोनालीला ट्विट करत म्हटले की, ‘देवाच्या कृपेने तू लवकर बरी होशील आणि चांगली बातमी घेऊन घरी येशील.’ मनिषाच्या या ट्विटला रिट्विट करत सोनालीने लिहिले की, ‘मनिषा तू माझी आयडॉल आहेस.’
सोनालीने तिच्या आजाराची माहिती देताना लिहिले की, सोनाली बेंद्रेनं लिहिलं, कधीकधी, अगदी अनपेक्षितरित्या, तुमचं आयुष्य एक वळण घेतं. मला नुकतंच हायग्रेड कॅन्सरचं निदान झालं आहे. जो सातत्यानं पसरत चालला आहे. असं निदान होणं हे आमच्यासाठी अनाकलनीय होतं. माझं कुटुंब आणि मित्रपरिवार सातत्यानं माझ्यासोबत होता आणि त्यांनी मला प्रचंड पाठिंबा दिला. असे जीवलग लाभणं ही भाग्याची गोष्ट आहे. मी त्या प्रत्येकाची आभारी आहे. त्वरित उपचार करणं याशिवाय याच्याविरोधात लढण्याचा आणखी चांगला पर्याय नाही.त्यामुळेच, माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आम्ही खूप आशावादी आहोत आणि प्रत्येक टप्प्यावर या आजाराशी लढण्याचा आम्ही निर्धार केला आहे.
हेही वाचा: Thai Cave Rescue: मुलांना वाचवताना माजी नेव्ही सिल कमांडोचा मृत्यू मदर तेरेसांच्या संस्थेतून झाली मुलांची विक्री, संशयितांना अटक ५६ इंच छातीपेक्षा छातीवर किती मेडल आहेत त्याला अधिक महत्व- उद्धव ठाकरे