JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / सोलापूरच्या छोट्या कार्तिकने लावला भन्नाट शोध, मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, तुम्हीही कराल कौतुक

सोलापूरच्या छोट्या कार्तिकने लावला भन्नाट शोध, मिळाला राष्ट्रीय पुरस्कार, तुम्हीही कराल कौतुक

सोलापूरच्या कार्तिकनं स्वयंपाक घरातील अपघात टाळण्यासाठी मोठी आयडिया दिली आहे. त्याची ही आयडिया देशपातळीवर सुपरहिट ठरलीय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर, 11 मे : शाळेत अभ्यास करताना मुलांना अनेक  प्रश्न पडतात. काही जण या प्रश्नाची उत्तरं ही पुस्तकात शोधतात. काही शिक्षक किंवा पालकांना विचारतात. तर काही जण तेवढ्यावरच न थांबता त्या विषयावर संशोधन करतात. सोलापूरचा कार्तिक माडिवाळे हा देखील याच पद्धतीचा एक संशोधक विद्यार्थी आहे. त्याच्या संशोधनाला राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे. माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ ‘चाईल्ड क्रिएटिव्हिटी अँड इनोवेशन अवॉर्ड’ दिला जातो. इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना या पुरस्कारासाठी होणाऱ्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी असते. या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आठवीत शिकणाऱ्या सोलापूरच्या कार्तिकनं बाजी मारलीय.

काय केलं संशोधन? गॅसवर मोठं भांड ठेवून स्वयंपाक तुम्ही अनेकदा केला असेल. हे भांड ठेवल्यानंतर अनेकदा गॅस विझतो. गॅस विझल्यानंतर ते भांड खाली ठेवून गॅस पेटवावा लागतो. अथवा, त्यावेळी बर्नरपाशी लायटर जात नसल्यानं काडीनं गॅस पेटवावा लागतो. या सर्व खटाटोपात अनेकदा अपघात होण्याची शक्यता असते. कार्तिकनं हा अपघात टाळण्यासाठी खास संशोधन केलं आहे. बैलगाडी उलटली, दोन्ही पाय गेले, पण सचिन थांबला नाही, जिद्दीची अनोखी कहाणी, Video गॅस किंवा शेगडीपाशी एक छोटसं होल करुन जागा तयार केली तर तिथं लायटर सहज जाईल. त्यामुळे संभाव्य अपघात टाळतील अशी आयडिया कार्तिकनं दिली. कार्तिकची ही आयडिया देशभरात सुपरहिट ठरलीय. त्याला राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाला आहे. कार्तिकला नवं शोधण्याचा ध्यास आहे. मी स्वयंपाक घरात काम करत असताना तो काही तरी खटाटोप करत असे. त्यानं माझ्याशी या विषयावर अनेकदा चर्चाही केली. या सर्वांमधून त्याला ही आयडिया सुचली, अशी प्रतिक्रिया कार्तिकच्या आईनं दिली. कार्तिकनं लहान वयातच मोठ्या प्रश्नावर उपाय शोधला आहे. छोट्या संकल्पनेतूनच मोठ्या कंपन्या उभ्या राहतात. त्याचप्रमाणे कार्तिकनं सुचवलेला हा उपाय भविष्यात दिग्गज कंपन्या स्विकारतील हे नक्की.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या