JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / थेट मतदान केंद्रावरच शुभांगी पाटील यांच्याकडून प्रचार? हात जोडून.. Video व्हायरल

थेट मतदान केंद्रावरच शुभांगी पाटील यांच्याकडून प्रचार? हात जोडून.. Video व्हायरल

MLC Graduation Election : संगमनेर शहरातील मतदार केंद्रावर शुभांगी पाटील प्रचार करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे.

जाहिरात

थेट मतदान केंद्रावरच शुभांगी पाटील यांच्याकडून प्रचार?

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदनगर, 30 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज पाच जिल्ह्यात मतदान पार पडत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात मुख्य लढत आमदार सुधीर तांबे यांचा मुलगा काँग्रेसचे बंडखोर सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या पुरुस्कृत अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये आहे. दरम्यान, सत्यजित तांबे यांच्या संगमनेर शहरात शुभांगी पाटील यांच्या मतदान केंद्रांना भेटीगाठी सुरू आहेत. यावेळी शुभांगी पाटील मतदारांना हात जोडून मतदान करण्याची विनंती करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला. यानंतर प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

संबंधित बातम्या

शुभांगी पाटील यांना अधिकाऱ्यांनी रोखलं.. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या आघाडीच्या उमेदवार आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे मतदान केंद्रावर प्रचार करत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. शुभांगी पाटील मतदारांना हात जोडून मतदान करण्याची करत विनंती करत असल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर मतदार केंद्रावर उपस्थित असलेल्या प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना रोखलं. सत्यजित तांबे यांच्या संगमनेर शहरात शुभांगी पाटील मतदान केंद्रांना भेट देत आहेत. वाचा - MLC Election : सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार? विखे पाटलांचं सूचक वक्तव्य! ही निवडणूक एकतर्फी झाली : सत्यजित तांबे “ही निवडणूक एकतर्फी कशी ते तुम्हाला निकालातून दिसेल. विजय अगोदरच झालेला आहे, आता फक्त उत्सुकता एवढीच आहे की मताधिक्य किती होतं. मतदान किती जास्तीत जास्त होतं, त्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. ” असं सत्यजित तांबेंनी म्हटलं आहे. याचबरोबर, प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सत्यजित तांबेंनी सुरुवातीला सांगितले की, “ज्या पद्धतीने या मतदारसंघात मागील 14 वर्षे माझ्या वडिलांनी प्रतिनिधत्व केलं. एकंदरीतच या पाचही जिल्ह्यांमध्ये ज्या पद्धतीचा ऋणानुबंध त्यांनी इथल्या सामान्य जनतेशी, मतदारांशी निर्माण केला. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली.”

शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना अखेर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. यापूर्वी पाटील यांच्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली होती. सुभाष जंगले नगर जिल्ह्यातून येतात नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. एक लाख मतदारांची नोंदणी केल्याचं शुभांगी पाटील खोटं बोलत आहेत. सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे. जंगले यांनी देखील मला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल म्हणून दावा केला होता. मात्र, आता शुभांगी पाटील यांना पाठिंबा मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या