Mumbai: Shiv Sena Chief Uddhav Thackeray and Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis arrive for the rituals marking the start of the construction of a memorial for Shiv Sena founder Bal Thackeray in Dadar, Mumbai, Wednesday, Jan. 23, 2019. (PTI Photo/Shashank Parade) (Story no BOM4)(PTI1_23_2019_000115B)
मुंबई, 17 सप्टेंबर : आगामी विधानसभा निवडणुकांचं जोर राज्यात दिसू लागला आहे. अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी युतीचं घोडं अद्यापही अडलेलं आहे. दरम्यान, रविवारी रात्री शिवसेनेनं 135 जागांसाठी मागणी केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर 9 जागा या मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचं त्यांनी प्रस्तावात म्हटलं आहे. त्यामुळे आता हा प्रस्ताव भाजपला मान्य असणार की ते स्वबळावर लढण्याचा निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात विधानसभेतील युतीवर अनेक वेळा चर्चा झाली. पण त्यातून काहीही तोडगा निघाला नाही. त्यात भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. असं असताना आता शिवसेनेनं 135 जागांचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे. यासंबंधीचं वृत ‘महाराष्ट्र टाईम्स’नं दिलं आहे. रविवारपासून युतीत जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये 50-50 असा फॉर्म्युला दोन्ही पक्षांना मान्य होता. त्यानुसार त्यांना राज्यात यशही मिळालं. पण लोकसभा निवडणुकांनंतर भाजप आणि सेनेमध्ये जोरदार इनकमिंग झालं. त्यामुळे 50-50चा फॉर्म्युल्यानुसार आताही 144 पैकी 135 शिवसेनेला तर 9 जागा मित्रपक्षाला देण्याचा प्रस्ताव शिवसेनेनं ठेवला आहे. भाजपच्या विद्यमान आमदारांच्या 122 जागा यामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीतून आयात झालेल्या नेते आणि आमदारांच्या जागेचा समावेश नाही. इतर बातम्या - BREAKING: काँग्रेसला धक्का दिल्यानंतर आता उर्मिला मातोंडकर उचलणार मोठं पाऊल! काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी पक्षाला रामराम ठोकत सेना आणि भाजपात प्रवेश केला. त्यामुळे राज्यात आघाडीला मोठं खिंडार पजलं असं बोललं जात आहे. या इनकमिंगमुळे दोन्ही पक्षात तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेना स्वबळावर विधानसभा निवडणूक लढणार अशाही चर्चा आहेत. दरम्यान, शिवसेना 135 वरून 130 किंवा 125 जागांवर समझोता करू शकते. यावर भाजपकडून दोन दिवसांत कळवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. इतर बातम्या - राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, आठवडाभरात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात, कधीही होऊ शकते विधानसभेची घोषणा! राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हे पथक मंगळवारी आणि बुधवारी मुंबईत येऊन स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. मुंबईत आढावा घेतल्यानंतर बुधवार पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, याच वेळी निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 2 दिवसांत विधानसभा निवडणुकांचं बिगूल वाजण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत निवडणुकांचा आढावा घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट दिल्लीत सादर केले जातील. त्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आचारसंहिता जाहीर केली जाईल. महाराष्ट्रासह तीन राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग (Election Commision of India) महाराष्ट्र (Maharashtra), हरियाणा (Haryana) आणि झारखंड (Jharkhand)या तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा करू शकते. या तिन्ही राज्यात या वर्षा अखेरीस निवडणुका पार पडणार आहेत. इतर बातम्या - #NewsToday: आज दिवसभारात घडणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या 5 बातम्या महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये पहिला निवडणुका होतील. अर्थात अद्याप या दोन्ही राज्यांतील निवडणुकीसंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध केलेली नाही. या दोन्ही राज्यात दिवाळीच्या आधी नवे सरकार स्थापन होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेसंदर्भात केंद्रीय निवडणू्क आयोगाची बैठक देखील होणार आहे. या बैठकीत तिन्ही राज्यातील निवडणुकांची घोषणा कधी करायची यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. तर हरियाणा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 90 आणि 82 जागा आहेत. या तिन्ही राज्यात ऑक्टोबर 2014 विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. तर निकाल 19 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले होते. तिन्ही राज्यातील विधानसभेचा कालावाधी लवकरच संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे. इतर बातम्या - नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का, ‘या’ मतदारसंघातून शिवसेना लढणार विधानसभा! तिन्ही राज्यात भाजपची सत्ता महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तिन्ही राज्यात 2014मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप(Bharatitya Janta Party)ने सत्ता मिळवली होती. महाराष्ट्रातील 288 पैकी 122 जागा भाजपला मिळाल्या होत्या. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)मुख्यमंत्री झाले होते. हरियाणातील 90 पैकी 47 जागांवर भाजपने विजय मिळवला होता आणि मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar)यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. झारखंडमध्ये 77 पैकी 35 जागांवर विजय मिळवत भाजपने सत्ता मिळवली होती आणि रघुबर दास (Ragubhar Das) हे मुख्यमंत्री झाले होते. हेल्मेटचा जुगाड: हेल्मेट म्हणून चक्क डोक्यावर ठेवलं स्टीलचं पातेलं VIRAL VIDEO