JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / अखेर शिशिर शिंदेंची 'घरवापसी',कान धरून मागितली शिवसैनिकांची माफी

अखेर शिशिर शिंदेंची 'घरवापसी',कान धरून मागितली शिवसैनिकांची माफी

मुंबई, 19 जून : मनसेचे माजी आमदार आणि नेते शिशिर शिंदे यांनी अखेर मनसेला रामराम ठोकलाय. आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशिर शिंदे शिवबंधनात बांधले गेले. मनसे एकीकडे नव्याने मोर्चेबांधणी करत आहे तर दुसरीकडे गळती सुरूच आहे. शिवसेनेतून मनसेत दाखल झालेले शिशिर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. आज या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. मुंबईतील गोरेगाव इथं शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात शिशिर शिंदेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 जून : मनसेचे माजी आमदार आणि नेते शिशिर शिंदे यांनी अखेर मनसेला रामराम ठोकलाय. आज शिवसेनेच्या वर्धापन दिनी  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशिर शिंदे शिवबंधनात बांधले गेले. मनसे एकीकडे नव्याने मोर्चेबांधणी करत आहे तर दुसरीकडे गळती सुरूच आहे. शिवसेनेतून मनसेत दाखल झालेले शिशिर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. आज या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. मुंबईतील गोरेगाव इथं शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात शिशिर शिंदेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

मनसेच्या कार्यकारिणीतून शिशिर शिंदेंना डच्चू

वयाच्या सतराव्या वर्षी शिवसेनेत दाखल झालो होतो तेव्हा एका हाती झेंडा आणि एका हातात धोंडा घेतला होता. जेव्हा उद्धव ठाकरेंची भेट घेतली ती खूप भावनिक होती.   उद्धव ठाकरेंचा हात हातात घेतला तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंचा भास झाला आता हातात भगवा झेंडा आणि दुसऱ्या हाता धोंडा घेऊन कामाला लागणार असा पवित्राच शिंदेंनी जाहीर केला. स्वबळाचा नारा दिलाय, आता शांत बसू नका- आदित्य ठाकरे तसंच माझ्याबद्दल काही क्लिप  व्हायरल झाल्यात आहेत. पण त्याबद्दल शिवसैनिकांची कान धरून माफी मागतो असं म्हणत आपल्याला माफ करावं अशी विनवणीही शिंदेंनी केली. शिशिर शिंदेंचा परिचय १) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले शिवसैनिक २) शिवसेनेत २४ वर्षे विविध पदांवर कार्यरत ३) १९९२ साली वानखेडे स्टेडियमवरील भारत X पाकिस्तान क्रिकेट सामन्याची खेळपट्टी उखडून टाकणारे नेते. ४) शिवसेनेतून विधान परीषदेसाठी प्रयत्न केले होते. मात्र त्यात अपयशी ठरले होते. ५) राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना सोडणारे शिलेदार ६) २००९ साली ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार किरीट सोमय्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय पाटील यांना कडवी झुंज दिली. संजय पाटील यांचा अवघ्या ३००० मतांनी निसटता विजय झाला होता. किरीट सोमय्या यांचा पराभव शिशिर शिंदे यांना मिळालेल्या मतांमुळे झाला होता. ७) २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भांडुप विधानसभा मतदारसंघातून विजयी ८) २०१४ साली भांडुप विधानसभा निवडणुकीत पराभव ९) २०१७ साली मुंबई महापालिका निवडणूक निर्णय प्रक्रियेत डावलल्यामुळे, मनसेच्या सर्व पदांचा राजीनामा १०) आज १९ जून रोजी शिवसेनेत दाखल

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या