JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / 'नवरीनं माहेर सोडावं, तसं उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला', भुमरेंची बोचरी टीका

'नवरीनं माहेर सोडावं, तसं उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला', भुमरेंची बोचरी टीका

‘उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना घरातच बसून होते. कोरोनात ‘राजा घरी, जनता दारोदारी’ अशी स्थिती होती

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अमरावती, 25 सप्टेंबर : ‘मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाताच, उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगला सोडताना जसे नवरीने माहेर सोडावं. तसा हा इव्हेंट केला, अशी बोचरी टीका राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे यांनी केली. मुंबई येथे ५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह समर्थक मंत्री राज्यभरात शिवसेना हिंदु गर्व गर्जना संपर्क यात्रा राबवित आहे. त्या निमित्ताने अमरावतीत संदिपान भुमरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ‘उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना घरातच बसून होते. कोरोनात ‘राजा घरी, जनता दारोदारी’ अशी स्थिती होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाची खुर्ची जाताच, उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ बंगला सोडताना जसे नवरीने माहेर सोडावं. तसा हा इव्हेंट केला, अशी टीकाच भुमरे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. (‘राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण?’, आदित्य ठाकरेंचा तळेगावात आक्रोश) तसंच, मुख्यमंत्री असताना तोंडाला मास्क होता, मानेला पट्टा होता, पण मुख्यमंत्रिपद जाताच आता मास्क राहिला नाही, आता सगळीच तारांबळ उडाली आहे, अशी टीकाही भुमरे यांनी केली. पालघरमधून शिवसेना जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटाला पाठिंबा दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला पुन्हा आव्हान देण्यासाठी शिंदे गटाने डिवचलं आहे. शिवसेनेच्या पालघर जिल्हा प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. (सुप्रिया सुळेंशी पंगा घेणे शिंदे गटाच्या नेत्याला पडले भारी, आता केला घुमजाव, पण तक्रार दाखल) पालघरचे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव संख्ये आणि पालघर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांच्यासह पालघर जिल्ह्यातील अनेक जेष्ठ शिवसैनिकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला आपला पाठींबा जाहीर केला. त्यामुळे मुख्य शिवसेनेसाठी हा झटका मानला जातोय. एकनाथ शिंदे यांचा हे धक्कातंत्र असल्याचं मानलं जात आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढे पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिवसेनेच्या विस्तारासाठी जिल्ह्यात कार्यरत राहण्याचे निर्देश दिले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या