मुंबई, 25 डिसेंबर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महान क्रिकेटपटू आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याची (X सुरक्षा) मागे घेतली आहे. त्याचबरोबर, शिवसेना आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. आदित्यला आतापर्यंत Y + श्रेणीची सुरक्षा देण्यात येत होती पण आता त्यांची सुरक्षा Z प्रकारात सुधारित करण्यात आली आहे. याशिवाय अण्णा हजारे यांच्यासाठीही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. त्यांना Z प्रकारची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्यातील हायप्रोफाईल लोकांच्या सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयात सचिनची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्धव यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीत, “सचिनला X श्रेणी सुरक्षा देण्यात आली होती. त्याअंतर्गत पोलिस कॉन्स्टेबल 24 तास त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असायचे. मात्र आता हे संरक्षण मागे घेण्यात आले आहे”, असे सांगितले. वाचा- महाराष्ट्राच्या इतिहासात मुख्यमंत्री राहिलेले 2 नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत
वाचा- अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या नावाची पाटी बदलली आणि सभेत पिकला मोठा हशा मंगळवार (24 डिसेंबर) रोजी सचिननं मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यामुळं आता सुरक्षा काढल्यामुळेच सचिननं ही भेट घेतली असावी अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. सचिन बरोबरच सुनिल गावस्कर यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. दर तीन महिन्यांनी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आणि हटवण्यात येते. वाचा- तुम्हीही चालवू शकता शिवभोजन योजना, या आहे अटी आणि नियम!
नेत्यांची सुरक्षाही केली कमी सचिनची सुरक्षा काढून घेण्यात आली असली तरी, पोलिस एस्कॉर्ट सुविधा दिली जाऊ शकते असा दावा आयपीएस अधिकाऱ्यांनी केला आहे. या व्यतिरिक्त इतर अनेक नेत्यांची सुरक्षादेखील कापण्यात आली आहे. भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याकडे वाय श्रेणी सुरक्षेसह पोलिस स्कॉटची सुविधा होती. आता स्कॉटची सुविधा काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेशचे माजी गव्हर्नर राम नाईक यांना आतापर्यंत झेड प्लस सुरक्षा होती. ते कमी करून, त्यांना आता एक्स श्रेणीचे संरक्षण देण्यात आले आहे. अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांना झेड प्लस सुरक्षा काढून एस्कॉटसह वाय श्रेणी सुरक्षाही देण्यात आली आहे.