JOIN US
मराठी बातम्या / बातम्या / Sacred Games च्या बंटीला क्रिकेट खेळताना लागला बॉल आणि नंतर...

Sacred Games च्या बंटीला क्रिकेट खेळताना लागला बॉल आणि नंतर...

सेक्रेड गेम्समधील बंटी अर्थात जतिन सरना या सिनेमात यशपाल शर्मा यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. जतिन त्याच्या भूमिकेसाठी तासन् तास मेहनत घेतोय.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 02 जून- बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने आपल्या आगामी ‘83’ सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली. रणवीर गेल्या काही आठवड्यांपासून कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेत आहे. लवकरच सिनेमाची टीम स्कॉटलँडमधील ग्लासगो येथे सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. एकीकडे सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून दुसरीकडे सिनेमात इतर स्टार कोण असणार याचा खुलासाही नुकताच करण्यात आला. रणवीरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून रणवीरने सिनेमाची स्टारकास्ट शेअर केली होती. यात त्याच्यासोबत हार्डी संधू, साकिब सलीम, साहिल कट्टर, जतिन सरना, एमी विर्क, आदिनाथ कोठारे, चिराग पाटील आणि तमिळ अभिनेता जीवाही असणार आहेत. सैफ-करिनाच्या लग्नाचा फोटो व्हायरल, असे दिसायचे सारा- इब्राहिम

जोरदार हवेने ‘या’ अभिनेत्रीला दिला त्रास, असा सांभाळावा लागला ड्रेस नुकताच रणवीरने क्रिकेटचा सराव करतानाचा एक किस्सा सांगितला. सेक्रेड गेम्समधील बंटी अर्थात जतिन सरना या सिनेमात यशपाल शर्मा यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. जतिन त्याच्या भूमिकेसाठी तासन् तास मेहनत घेतोय. जतिन अनेक तास मैदानात क्रिकेटचा सराव करायचा. एक दिवस असाच सराव करत असताना जतिनला बॉलचा अंदाज आला नाही आणि संवेदनशील ठिकाणी बॉल लागला. जतिनने एल गार्ड घातलेले असल्यामुळे त्याला फारशी दुखापत झाली नाही. अभिनयाशिवाय ‘या’ क्षेत्रातही काम करते सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपूर्वी कपिल देव यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवण्यासाठी रणवीर सिंग त्यांच्या घरी गेला होता. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मधु मंटेना, विशु इंदुरी, कबीर खान आणि साजिद नाडियाडवाला यांनी मिळून 83 सिनेमाची निर्मिती केली आहे. पुढच्या वर्षी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. VIDEO: नाशिकच्या गोदावरीत अजय देवगणने केलं वडिलांचं अस्थी विसर्जन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या